फोटो सौजन्य - Social Media
आज वर्षाचा नवीन दिवस आहे. २०२५ ला सुरुवात झाली आहे. या दिवसात लोकं सर्व दुःख विसरून आनंदाने एकमेकांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतात. अशामध्ये सगळीकडे पार्टी आणि खाणे पिणे सुरूच असतात. लोकं आपापल्या पद्धतीने नवं वर्षाचे स्वागत करतात. दरम्यान, अशामध्ये ऑनलाईन शॉप्सवर फार गोष्टी खरेदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये खाण्या पिण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. पार्टीसंबंधित गोष्टी जास्त प्रमाणात विकल्या गेल्या आहेत.
सोशल प्लॅटफॉर्मवर या वस्तूंना होती मागणी
ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा आणि स्विगी आणि स्विगी इंस्टामार्टचे सह-संस्थापक फणी किशन ए यांनी X वर महत्वाच्या बाबी शेअर केल्या आहेत. यामध्ये दोन्ही सोशल प्लॅटफॉर्मवरील नवं वर्षात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तूंविषयी गोष्टी प्रदर्शित केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि नवीन वर्षाच्या या संध्याकाळी सर्वात जास्त मागवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये या ५ वस्तूंचा समावेश आहे: दूध, चिप्स, चॉकलेट, द्राक्षे, पनीर.
तसेच या दिवसांमध्ये आईस क्यूबची मागणीही वाढलेली पाहिली गेली आहे. एकंदरीत, ब्लिंकिंटवर काल रात्री ८ वाजता ६,८३४ आईस क्युबस पाकिटे विकली गेली आहेत. तसेच अनेक क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या मागणीत वाढ पाहण्यात आली आहे. बिग बास्केटवर आईस क्यूबच्या मागणीमध्ये 1290% टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहण्यात आली आहे. तसेच कोल्ड ड्रिंकचे मागणीचेही प्रमाण फार वाढले आहे.
बिगबास्केटवर देखील, अल्कोहोलशिवायचे पेय पदार्थांच्या विक्रीत 552% आणि डिस्पोजेबल कप व प्लेट्सच्या विक्रीत 325% वाढ झाली आहे. यावरून घरगुती पार्ट्यांना उधाण आल्याचे स्पष्ट होते. सोडा आणि मॉकटेलच्या विक्रीतही 200% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. स्विगी इंस्टामार्टचे सह-संस्थापक फणी किशन ए यांनी ट्विट केले की, संध्याकाळी 7:41 वाजता बर्फाच्या विक्रीने उच्चांक गाठला, त्या मिनिटात 119 किलोग्रॅम बर्फ वितरित करण्यात आले.
कंडोमच्या विक्रीत झाली वाढ
३१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत कंडोमच्या ४,७७९ पाकिटांची विक्री इंस्टमार्टवर नोंद करण्यात आली होती. संध्याकाळ होताच या वाढीमध्ये कमालीची वाढ पाहण्यात आली आहे. ब्लिंकिटचे सीईओ यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री 9.50 वाजता पोस्ट करून सांगितले की 1.2 लाख कंडोम पॅक ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. ढींडसा यांनी कंडोमच्या फ्लेवर्सबाबत माहिती दिली, ज्यात चॉकलेट सर्वात लोकप्रिय ठरला. एकूण विक्रीपैकी 39% चॉकलेट फ्लेवर कंडोमची विक्री झाली, 31% स्ट्रॉबेरी फ्लेवरची तर 19% बबलगम फ्लेवरची विक्री झाली.