'या' लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन
वर्षाच्या बाराही महिने बाजारात वेगवेगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे भेंडी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. घरात भेंडीच्या भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भेंडी फ्राय, भरली भेंडी, बेसन भेंडी किंवा दही भेंडी, मसाला भेंडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. भेंडीच्या भाजीमध्ये असलेले गुणधर्म शरीराला पोषण देतात. या भाजीमध्ये फायबर, विटामिन सी, के, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
भारतातील महिलांच्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
शरीरातील हाडे दीर्घकाळ मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी आहारात भेंडीची भाजी खावी. पण आपल्यातील अनेकांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही. भेंडीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. कारण भेंडी अतिशयचिकट असते. भेंडीच्या भाजीमधील चिकटपणामुळे भाजी खाण्याचा कंटाळा केला जातो. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
किडनी स्टोन झालेल्या लोकांनी आहारात चुकूनही भेंडीच्या भाजीचे सेवन करू नका. कारण यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. शरीरामध्ये ऑक्सलेट आणि कॅल्शियम एकत्र झाल्यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनीमध्ये बारीक बारीक कण साचून राहिल्यानंतर कालांतराने खड्डे मोठे होतात आणि पोटात वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यास भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये. तसेच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी बिया असलेल्या भाज्यांचे किंवा पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
युरिक अॅसिड वाढल्यानंतर गाऊटची किंवा संधिवाताची समस्या उद्भवते. त्यामुळे भेंडीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये. भेंडीमध्ये असलेले ऑक्सलेट्स युरिक अॅसिडचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे सांध्यांना सूज येणे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात भेंडी खाऊ नये.
वारंवार सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा ‘या’ बिया, वयाच्या १०० व्या वर्षी हाडे राहतील मजबूत
भेंडीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. पण सतत पोटफुगी, गॅस किंवा आतड्यासंबंधित समस्या जाणवत असतील तर भेंडीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनाच्या समस्या आणखीनच वाढतात आणि आरोग्य बिघडून जाते.