इलियाना डिक्रुझने सांगितले का मुलांना एकटीने सांभाळत आहे (फोटो सौजन्य - Instagram)
अमेरिकेत स्थलांतरित झाल्यापासून इलियाना डिक्रूझने आपल्याविषयी फारसे बोलणे टाळले आहे, कारण सध्या ती स्वतःच्या मुलांचे संगोपन करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. या अभिनेत्रीचे लग्न मायकेल डोलनशी झाले आहे आणि ती तिच्या दोन मुलांसह ह्युस्टन, टेक्सास येथे राहते. तिचा मुलगा कोआ फिनिक्स डोलनचा जन्म १ ऑगस्ट २०२३ रोजी झाला आणि तिचा दुसरा मुलगा कीनू राफे डोलनचा जन्म १९ जून २०२५ रोजी झाला आहे.
३० ऑगस्ट रोजी, इलियाना डिक्रूझने अभिनेत्री नेहा धुपियाशी तिच्या आई होण्याच्या प्रवासाचा आनंद घेतल्याबद्दल चर्चा केली. इलियानाने खुलासा केला की तिला आया ठेवायची नव्हती आणि ती थकलेली असतानाही स्वतः तिच्या मुलांची काळजी घेण्यास प्राधान्य देत आहे. इलियानाने सांगितले की तिचा सक्रिय पालक असण्यावर अधिक विश्वास आहे आणि तिच्या मुलांच्या दैनंदिन जीवनापासून दूर करण्याची तिची अजिबात इच्छा नाही. तिने आणि तिचा पती त्यांच्या व्यस्त जीवनात असूनही मुलांची स्वतः काळजी का घेतात हे स्पष्ट केले.
पती मायकल डोलनसोबत तिच्या दोन्ही मुलांना वाढवण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता, अभिनेत्रीने सांगितले की ते दोघेही सक्रिय पालक आहेत. ती म्हणाली, “आमच्याकडे मदतनीस नाहीत आणि मुंबईत असण्याची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप मदत मिळते. आणि तुमच्याकडे खूप काही उपलब्ध आहे, जसे की, तुम्हाला माहिती आहे, माझे मित्रमैत्रिणी तिथे आहेत आणि खरं तर मुंबई हे ह्यूस्टनपेक्षाही घरासारखे आहे. पण मला वाटते की इथे अमेरिकेत असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्वकाही एकांतात आहे. माझ्या स्वतःच्या छोट्याशा लहानशा जगात असणे खूप छान आहे.”
इलियाना पुढे म्हणाली की, “प्रत्येक आईला माइक (मायकल डोलन) सारखाच आधार देणारा जोडीदार असावा असे मला खरोखर वाटते, कारण तो पहिल्या दिवसापासून प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत आहे. त्याने मला बसवले आणि म्हटले, ‘जर तुला मदत हवी असेल तर आपण मार्ग शोधून काढू. आपल्याला मदत मिळेल. आपण थेरपी घेऊ. जर तुला एखाद्या नॅनीची गरज असेल तर आपण तशी व्यवस्था करू शकतो.’ मी त्यावर त्याला उत्तर दिलं की, ‘नाही, आपल्याला आया नको आहे. मला अजिबात नको.’ म्हणून, मला वाटते की आमचं आयुष्य अधिक सुंदर आहे.
10 वर्षाच्या आत मुलांना शिकवा 5 Skills, यशस्वी भविष्यच मिळेल याची खात्री!
शेवटी, मदतीशिवाय आणि आयाशिवाय मुलांना वाढवणे चांगले की वाईट हे स्वतःच्या परिस्थिती, मूल्ये आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. परंतु इलियानाच्या मते, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबासाठी पालक आणि मुले दोघांच्याही कल्याणात मदत करणारा समतोल निर्माण करणे गरजेचे आहे. ती म्हणाली की तिला वाटते की ती तिच्या मुलांच्या दैनंदिन जीवनात अधिक सहभागी होऊ शकते, निर्णय घेऊ शकते आणि त्यांना योग्य मूल्ये शिकवू शकते.
इलियाना डिक्रूझ म्हणाली, “मला वाटतं कुठेतरी मला एक जबाबदार आई व्हायचं होतं आणि हो, कदाचित आपल्याकडे इथे (अमेरिकेत) एक आया असण्याचा पर्याय असेल, पण मला ते करायचं नव्हतं. आणि मला वाटतं की ते अशा ठिकाणाहून येतं जिथे मला सगळं इतरांवर सोडून देण्याची खूप भीती वाटते. विशेष म्हणजे माझ्या मुलांवर लक्ष ठेवणं आणि त्यांची काळजी घेणं आणि मला वाटतं की गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने करायच्या आहेत. आणि मला वाटतं की लोकांना ते समजणार नाही.’ मी ते सध्या व्यवस्थित सांभाळत आहे असं मला वाटतं हे देखील तिने आवर्जून या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. नव्या पालकांनी इलियानाकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे.
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध