चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! टोनर म्हणून वापरा 'हे' जादुई पाणी
त्वचा कायमच सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. पण वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे, पिंपल्स, फोड, वांग इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेस सीरम लावून त्वचेची काळजी घेतली जाते तर कधी वेगवेगख्या क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. सुंदर आणि तरुण त्वचेसाठी कायमच स्किन केअर रुटीन फॉलो न करता आहारातसुद्धा हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासह त्वचासुद्धा कायमच चमकदार राहते.(फोटो सौजन्य – istock)
आठवड्यातून दोनदा केसांना लावा ‘हे’ गुणकारी तेल! गुडघ्यांपर्यांत होईल केसांची मजबूत वाढ, दिसाल सुंदर
चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, ऍक्ने किंवा इतर कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महागड्या आणि केमिकलयुक्त स्किन केअरचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे टोनर त्वचा कायमच फ्रेश आणि निरोगी ठेवते. धावपळीच्या कामामुळे बऱ्याच महिला चेहऱ्यावर टोनर किंवा सनस्क्रीमचा वापर करत नाहीत मात्र असे न करता स्किन केअर फॉलो करावे.
स्किन केअर रुटीन फॉलो करताना त्वचा टोनिंग करणे खूपच गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्यावरील टाईटनेस कायमच टिकून राहतो आणि त्वचा सुंदर दिसू लागते. त्वचेवर टोनर लावल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. यासाठी वाटीमध्ये गुलाब पाणी, कोरफड जेल, काकडीचा रस आणि थंड झालेली ग्रीन टी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण काचेच्या बंद बाटलीमध्ये भरून ठेवा आणि मेकअप किंवा स्किन केअर करण्याआधी संपूर्ण चेहऱ्यावर करण्याआधी लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चमकदार दिसेल. टोनर लावल्यामुळे चेहऱ्यावर केवळ ग्लो येत नाही तर त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.
कोरफड जेल त्वचा हायड्रेट ठेवते. याशिवाय त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल वापरावे. तर गुलाब पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचेवरील ग्लो कायमच टिकून राहतो. तसेच चेहरा चमकदार दिसू लागतो. काकडीच्या रसात असलेल्या पाण्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते.