छत्रपती शिवाजी महाराजांवर विषप्रयोग की विषमज्वर?
जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सुवर्णक्षणांमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या नावाचा ठसा संपूर्ण जगभरात उमटवला आहे. इतिहासातील सगळ्यात दुःखाचा आणि काळा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले. संपूर्ण मराठा साम्राज्याचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवरायांनी 3 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाखो मावळ्यांना सोबत घेत मराठा साम्राज्याची स्थापना केली. मराठा साम्राज्य उभे केले. याशिवाय शिवरायांच्या मुघलांसोबत अनेक लढाई सुद्धा झाल्या. या लढाईंमध्ये त्यांनी विजय मिळवला. शिवाजी महाराज्यांच्या मृत्यूआधी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता, असे म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – सोशल मिडिया)
शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळीस त्यांच्यासोबत पत्नी सोयराबाईसाहेब होत्या. सोयराबाईंनीच शिवाजी महाराजांवर विष प्रयोग केला, असे म्हंटले जाते. तर दुसरीकडे त्यांच्या गंभीर विश्ज्वराने झाला असे सुद्धा म्हंटले जाते. यातील नेमके काय खरे आणि खोटे याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे नेमके ठोस कारण कुठेही नाही. पण बखरीत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
शिवदिग्विजय बखरीत सांगितल्यानुसार, मराठा साम्राज्याच्या गादीवर शंभूराजांना न बसवता राजाराम महाराजांना बसवण्याची इच्छा सोयराबाईंनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी केलेले वक्तव्य शिवाजी महाराजांना मान्य नव्हते. यावरून सोयराबाई नाराज झाल्या होत्या. त्यानंतर सोयराबाईंनी महाराजांवर सूड उगवण्यासाठी विषप्रयोग केल्याचे बखरीत सांगण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाईंचा मृत्यू राज्याभिषेकापूर्वीच झाला होता. मात्र बखरीमध्ये सांगण्यात आल्यानुसार सोयराबाई शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळयाला उपस्थित होत्या. त्यामुळे शिवरायांच्या मृत्यूबद्दलचे कोणतेही ठोस पुरावे कुठेही देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवरायांवर नेमका विषप्रयोग झाला होता की नाही यात अनेक शंका आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज लहान मोठ्या मोहीम करून आल्यानंतर महाराजांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवायचा. अनेक पत्रांमध्ये असे देखील लिहिण्यात आले आहे की, इंग्रजांकडून विषमज्वराची औषधे सुद्धा मागवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना ब्लडी फ्लक्स झाल्याचे सांगण्यात आले होते. हा आजार प्रामुख्याने पशुपक्षांच्या सहवासात अधिकाकाळ घालवल्यामुळे होतो. ब्लडी फ्लक्स या आजाराची लागण झाल्यानंतर शरीराचे तापमान खूप जास्त वाढू लागते आणि रुग्णाचा मृत्यू होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी पेपरमध्ये अशाकाही बातम्या छापून आल्या होत्या.