इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर…, शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना असे करा अभिवाद
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघल आक्रमणांविरूद्ध मोठा संघर्ष केला. रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे देहावसन 3 एप्रिल 1680 दिवशी झाले. वयाच्या पन्नाशीत रायगडावर आजारपणातच शिवरायांचे निधन झाले. प्रजेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा राजा म्हणून शिवरायांची ओळख आहे. त्यांच्या धाडसाच्या, शौर्याच्या कथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
शिवाजींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. शिवाजी हा भोसले घराण्याचा सदस्य होता. त्यांनी विजापूर सल्तनतपासून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले ज्याने मराठा संघराज्याला जन्म दिला. 1674 मध्ये, रायगड किल्ल्यावर त्यांना औपचारिकपणे त्यांच्या राज्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. ते त्यांच्या युद्धकलेसाठी प्रसिद्ध होते, ज्यात घनिमी युद्ध (हल्ला चढवणे) आणि तटबंदीचा समावेश होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण आई जिजाबाई यांनी केले. त्यांनी शिवाजींना मराठा वारसा, हिंदू संस्कृती आणि मूल्ये सांगितली.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
जय भवानी
जय शिवाजी!
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिहांसनाधीश्वर… योगीराज…
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती!
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा..
छत्रपती शिवाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
वैकुंठ रायगड केला…
लोक देवगण बनला…
शिवराज विष्णू झाला..
वंदन त्याला…
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता..
जय भवानी.. जय शिवाजी..
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!
त्या मातीत मिसळावा देह माझा
जीवनाचे असे सार्थक व्हावे
चांगल्या कर्माची फळे नको मला
मरण फक्त त्या रायगडावर यावे
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
पराक्रमी योद्धा,
कुशल रणनीतिकार,
वीर महानायक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!