मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा 'ही' मुद्रा
दैनंदिन जीवन जगताना मानसिक ताणतणाव वाढल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. सतत डोकं दुखणे, कामामध्ये लक्ष न लागणे, चक्कर येणे, खाण्यापिण्याच्या इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. अशांत मनाला शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जगभरात सर्वच लोक मानसिक तणावाखाली जगत आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येतात. दैनंदिन जीवनातील कामावर त्याचा लगेच परिणाम दिसून येतो.
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी संतुलित आहार, झोप, व्यायाम, मुद्रा, पुस्तक वाचणे इत्यादी अनेक गोष्टींचा उपयोग होतो. मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर शरीरात हार्मोनल असंतुलित होतात. हार्मोनल असंतुलित झाल्यामुळे आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी मुद्रा किती फायदेशीर आहेत, याबद्दल सांगणार आहोत.तसेच कोणती मुद्रा केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते? चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘ही’ मुद्रा
सकाळी उठल्यानंतर मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यायाम आणि मुद्रा कराव्यात. याचा फायदा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी होतो. मानसिक आरोग्य चांगले असेल तरच शारीरिक आरोग्य चांगले राहते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यावर चिन्मय मुद्रा करावी. यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसावे. तसेच तुम्ही वज्रासनात सुद्धा बसू शकता. त्यानंतर अंगठ्याच्या टोकाने तर्जनीच्या टोकाला स्पर्श करा. हे सर्व करून झाल्यानंतर वर्तुळ तयार करा. नंतर उरलेली तीन बोट हाताच्या तळव्यावर वलयाकार बंद करून हात मांडीवर ठेवा. हे सर्व केल्यानंतर दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडा. असे पाच वेळा नियमित करा.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘ही’ मुद्रा