काखेतील काळे डाग क्षणार्धात होतील गायब!
वर्षाच्या बाराही महिने घामाची समस्या उद्भवतेच. सतत येणाऱ्या घामामुळे आणि काखेतील काळेपणामुळे सर्वच महिला त्रस्त आहेत. काखेत वाढलेले केस काढण्यासाठी महिला लेझरचा वापर करतात तर कधी वॅक्सिंग करून काखेतील केस काढले जातात. मात्र सतत काखेतील केस काढल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे काखेत घामाचा थर तसाच साचून राहतो. यामुळे काखेत वास येणे, त्वचा काळी दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काळवंडलेली काख सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त डिओड्रंट्स, अंडरआर्म व्हाइटनिंग क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र या क्रीम काहीकाळ त्वचेसाठी प्रभावी ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
World Vitiligo Day: विटिलिगोबाबत गैरसमज, जागरुकता महत्त्वाची; संसर्गजन्य आजार नाही तर…
काखेत वाढलेल्या काळेपणामुळे महिला स्लीव्हलेस कपडे घालणे टाळतात. तर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकलयुक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती पदार्थ त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवतात. याशिवाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंबू, हळद, कोरफड, दही यांच्यासोबत तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
घामामुळे काखेत साचून राहिलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुरटीची पावडर करून वाटीमध्ये घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण काखेतील काळेपणावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. काख कोरडी करून झाल्यानंतर त्यावर टोनर किंवा मॉश्ररायजर लावा. तुरटी त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी मदत करते. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय घामामुळे वाढलेला काळेपणाचा थर कमी होतो.
तुरटीमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. तसेच लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर केला जातो. लिंबामध्ये सिट्रिक अॅसिड आढळून येते, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुरटी त्वचेचा पीएच बॅलन्स संतुलित करते.
दही त्वचा आतून स्वच्छ करते. यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात तुरटी पावडर टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण काखेत लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. त्वचेवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी तुरटी प्रभावी ठरते.