लवंगचे पाणी कसे तयार करावे
भारतीय मसाल्यातील लवंग हा मसाला स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. जेवणात लवंगचा वापर केल्यानंतर पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. शिवाय या मसाल्याचा सुगंध जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळापासून जेवणात आणि आरोग्यासंबंधित समस्यांसाठी लवंगचा वापर केला जात आहे. लवंग अनेक आजारांवर गुणकारी आहे. यामध्ये विटामिन सी, ई, के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. गरम मसाला आणि इतर मसाले तयार करताना लवंगचा वापर केला जातो. त्याशिवाय तुम्ही लवंगचे पाणी घरी सुद्धा तयार करू शकता. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या कमी होतील. आज आम्ही तुम्हाला लवंगचे पाणी कसे तयार करावे? लवंगच्या पाण्याचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सांगणार आहोत. चला तर तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
लवंगचे पाणी तयार करणे अतिशय सोपे आहे. यासाठी कोमट पाण्यात रात्रभर 4 ते 5 अख्या लवंग टाकून भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रात्रभर भिजत ठेवलेले पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर 115 मिनिटं उकळी येण्यासाठी ठेवा. नंतर गॅस बंद करून पाणी थंड झाल्यानंतर प्या. यामुळे पचनक्रिया सुधरण्यास मदत होईल आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतील.
शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी लवंगचे पाणी अतिशय प्रभावी आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ अनेक आजारांची कारण बनतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर डिटॉक्स राहील. शिवाय शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी जळून जाण्यास मदत होईल. लवंगचे पाणी योग्य पद्धतीने प्यायल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित लवंगचे पाणी प्यावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे हाडांच्या वेदनांपासून आराम मिळतो. युजेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखी हायड्रो अल्कोहोलिक घटक लवंगांमध्ये आढळून येतात. शिवाय यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत होते. हाडांना आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही लवंगचे पाणी पिऊ शकता.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सतत बाहेरचे किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात लवंगच्या पाण्याचे सेवन करावे. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी लवंगचे पाणी मदत करते. सूज येणे, गॅस आणि ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी जेवल्यानंतर नियमित 1 लवंग चघळावी. लवंग खाल्यामुळे कमी झालेली भूक वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.