एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
चुकीच्या जीवनशैलीचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येतात. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव मेंदूसंबंधित आजाराचे कारण बनू शकतो. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी मानसिक आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. जगभरात कोरोना महामारीनंतर अनेक वेगवेगळे विषाणू पसरत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. एन्सेफलायटीस या मेंदूसंबंधित विषाणूमुळे जागतिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे सांगत एन्सेफलायटीसवर एक नवीन तांत्रिक अहवाल प्रकाशित केला आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होते. हा विषाणू सर्व वयोगटातील व्यक्तींना, लहान मुलांना प्रभावित करू शकतो.(फोटो सौजन्य – iStock)
2021 मध्ये जागतिक स्तरावर, एन्सेफलायटीस हे 5 वर्षांखालील मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल आरोग्य बिघाडाचे चौथे प्रमुख कारण होते आणि सर्व वयोगटातील 13 वे कारण होते.आशिया खंडातील भारत, जपान आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये एन्सेफलायटीसचा सार्वधिक प्रसार झाला आहे. दरवर्षी जगभरात सुमारे 1 ते 1.5 दशलक्ष लोक या गंभीर आजाराने ग्रस्त होतात. याशिवाय भारतामध्ये प्रति 100,000 लोकांमागे 16 प्रकरणे आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
एन्सेफलायटीस हा गंभीर न्यूरोलॉजिकल जीवघेणा विषाणू आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होऊ लागते. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. हा आजार विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा मेंदूवर चुकून हल्ला करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशींमुळे होण्याची शक्यता असते.एन्सेफलायटीस कारणीभूत असलेले विषाणू डास आणि टिक्स सारख्या कीटकांमुळे पसरू शकतात.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, पोट होईल स्लिम
एन्सेफलायटीससारख्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. ज्यामुळे या धोकादयक आजारापासून शरीराचे नुकसान होणार नाही. अँटीव्हायरल औषधे, स्टिरॉइड इंजेक्शन्स, इम्युनोग्लोबुलिन थेरपी, प्लाझ्माफेरेसिस, ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे इत्यादी उपचार करून हा आजार बरा केला जातो. मात्र एन्सेफलायटीस या आजाराची लागण झाल्यानंतर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.