हिरवी चटणी खाण्याचे फायदे
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीर आहे. पण खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. शरीराच्या आणि हृदयाच्या नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहण्यास सुरुवात होते. हा चिकट थर वाढू लागल्यानंतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मेथी दाण्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवताना केला जातो. कारण यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. हृदयाच्या नसांमध्ये चिटकून राहिलेला पिवळा चिकट थर काढून टाकण्यासाठी मेथी दाणे मदत करतात. मेथी दाण्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामध्ये कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हिरवी चटणी कशी तयार करावी? यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली मेथीची पाने, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर टाकून व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात हिंग, लिंबाचा रस, साखर, काळ मीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली हिरवी चटणी. ही चटणी नियमित खाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल.
हिरव्या चटणीचे नियमित सेवन केल्यास शरीराच्या नसांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. मेथीच्या पानांमध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट आढळून येतात. ज्यामुळे खरं कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मेथीच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीदाणे अतिशय प्रभावी आहेत. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.