कॅल्शियम युक्त पदार्थ
शरीरातील हाडे, दात, मजसंस्था निरोगी राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. पण शरीरात जर कॅल्शियमचं नसेल तर हाडे दुखणे, सतत दात दुखणे, चालताना किंवा उठताना पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराला सर्वच पोषक घटकांची आणि जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. शरीरामध्ये 99 टक्के कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. पण आपल्यातील अनेकांना दूध किंवा दही खायला आवडत नाही. दूध किंवा दह्याचे नाव काढल्यानंतर नाक मुरडतात.अशावेळी कॅल्शियम वाढवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ शोधले जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यासाठी दूध दह्याऐवजी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या शरीराला पोषण देण्याचे काम करतात. रोजच्या आहारात पालक, मेथी, मुळा, लाल माठ इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. शिवाय ब्रोकोलीचे सूप, पालकाची भाजी किंवा मेथीचे पराठे हे पदार्थ नाश्त्यात खावे. पालेभाज्या आरोग्यासोबतच चवीसुद्धा चांगल्या असतात.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सुका मेवा खायला खूप आवडतो. यामध्ये तुम्ही काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुका इत्यादी पदार्थ खाऊ शकता. या पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. शिवाय थकवा अशक्तपणा घालवण्यासाठी सुका मेवा खावा. रोजच्या आहारामध्ये पाच ते सहा अंजीर नियमित खाल्यास शरीरास आवश्यक असलेले कॅल्शियम मिळते. बदाम खाल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.
शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी पांढऱ्या तिळाचे सेवन केले जाते. पांढरे तीळ नियमित खाल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. शिवाय यामध्ये कॅल्शियम आणि झिंक आढळून येते. हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी पांढरे तीळ खावेत. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या तिळांपासून लाडू, चपाती किंवा तीळ आणि गूळ खाऊ शकता.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चवीला आंबट गोड असलेली फळे खायला सगळ्यांचं खूप आवडत. फळांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहे. फळांमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. फळांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. आहारात ब्रोकोली, बदाम, तीळ, सोयाबीन आणि फळांचे सेवन करावे.