शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
जीवन जगण्यासाठी पाणी पिणे फार आवश्यक आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन केले जाते. पाणी प्यायल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे नियमित 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे पाणी प्यायल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच शरीरातील प्रत्येक पेशींला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्याचे सेवन अधिक करावे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथी दाण्याचं पाणी..
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर डिहायड्रेड होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून रोजच्या आहारात काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी स्थिर राहते. शिवाय काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. काकडीमध्ये पाण्यासोबतच फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारून आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात काकडीचे सेवन केल्यास शरीरात थंडावा कायम टिकून राहील.
टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीर आणि त्वचा ताजी टवटवीत राहण्यास मदत होते. टरबूजमध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या फळामध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात टरबूजचे सेवन करावे. उन्हाळ्यात बाहेर फिरवून आल्यानंतर किंवा व्यायाम करून आल्यानंतर टरबूजचे सेवन करावे. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित एक नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी आहारात नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाण्यामध्ये कमी कॅलरीज असतात.
हे देखील वाचा: रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी ठरेल घातक! जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागल्यानंतर टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्यामुळे आरोग्य सुधारते. यामध्ये 93 टक्के पाणी असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन केल्यास त्वचा आणि शरीराला फायदे होतील.