थंडीच्या दिवसांमध्ये मूड सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
जीवन जगताना नेहमीच अनेक चढ उतार येत असतात. कधी मूड चांगला असतो तर कधी मूड खूपच खराब होऊन जातो. शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक बदल होण्यास सुरुवात होते. कामाचा तणाव, मानसिक तणाव, सतत बदलणारे मूड इत्यादी गोष्टीचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. जास्त मीठ, साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला फायदा होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर सतत मूड खराब होऊ लागतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात हंगामी फळांचे, भाज्यांचे सेवन करावे. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला सतत बदलणारा मूड सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर खूप कमी ऊन असते, ज्यामुळे शरीरात सेरोटोनिनची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आरोग्याला हानी पोहचवते. सेरोटोनिनला आनंदी संप्रेरक असेसुद्धा म्हंटले जाते. यामुळे शरीरात सतत मूड बदलणे, तणाव वाढणे, नैराश्य आणि चिंता वाढू लागतात.
शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. विटामिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात सतत थकवा अशक्तपणा जाणवणे, हाडं दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. सूर्यप्रकाशाची कमतरता निर्माण झाल्यानंतर विटामिन डी ची पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे सतत मूड खराब होतो.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडत. चॉकलेट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शिवाय यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल घटक मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठी मदत करतात. शिवाय सेरोटोनिनची पातळी वाढवतात.त्यामुळे दैनंदिन आहारात डार्क चॉकलेटचा समावेश करणे आवश्यक आहे.
अक्रोड खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय मूड चांगला राहतो. पाण्यामध्ये एक ते दोन अक्रोड भिजत घालून नंतरच त्यांचे सेवन करावे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तूप खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात तुपाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्यास शरीरसंबंधित अनेक समस्या दूर होतील आणि शरीर निरोगी राहील.