वयाच्या पन्नाशीमध्ये कायम तरुण दिसण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन
वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांसह पुरुषांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. त्वचा, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, त्वचेवरील सुरकुत्या किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. त्यामुळे वयाच्या पन्नाशीमध्ये तरुण दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी आहारात होणारे बदल, अधिक व्यायाम, ध्यान इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. वाढते वय कधीच कोणाला थांबवता येत नाही. त्यामुळे वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. वयाच्या पन्नाशीमध्ये त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट किंवा क्रीमचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी चेहऱ्याला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा बॉलिवूडमधील सेलिब्रिटी वय वाढल्यानंतर सुद्धा अतिशय सुंदर आणि अधिक तरुण दिसतात. चेहऱ्यावर हे तारुण्य वाढवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता आहारात बदल करून त्वचेची आणि फिटनेसची योग्य काळजी घेतली जाते. महिलांनी वयाच्या ३० नंतर स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या पन्नाशीमध्ये कायम तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात कायम फायबर युक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. फायबर शरीरासाठी आवश्यक असतात. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. ज्यामुळे पोट स्वच्छ होऊन पचनक्रिया सुधारते. पचनाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ खावेत. त्यामध्ये तुम्ही फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, ड्रायफ्रूट इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. फायबरयुक्त पदार्थांचे आहारात नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते.
काळवंडलेली त्वचा, टॅनिंग किंवा इतर काळे डाग घालवण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी, पपई, संत्री, शिमला मिरची, मिरची, हिरवे मटार, आंबट पदार्थ इत्यादींचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमधून शरीराला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते. त्यामुळे रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. आंबट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढते आणि त्वचा कायम तरुण आणि सुंदर दिसते.
वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ, दीर्घकाळ खोकला ठरू शकते दम्याचं लक्षण
कॅल्शियम युक्त पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील हाडांना अनेक फायदे होतात. वय वाढल्यानंतर हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जाते. कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाडं वारंवार दुखणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात दूध, पनीर, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, सोयाबीन, नट्स, टोफू इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीरात कॅल्शियम वाढेल.