एसटी विभागात ११३ जणांना पदोन्नती (फोटो- सोशल मीडिया)
१. पुणे विभागात ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती
२. कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे स्वप्न पूर्ण
३. तांञिक बाब दूर होताच उर्वरित कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार
पुणे/चंद्रकांत कांबळे: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात सन २०२४-२५ या वर्षात एकूण ११३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळाली आहे. विभागीय कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार अधिकारी वर्गातील ८ जणांना तर कर्मचारी वर्गातील १०५ जणांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची स्वप्ने पूर्ण झाली आहेत.
दिलेलेल्या आकडेवारीनुसार अधिकारी वर्गात विभागीय वाहतूक अधिकारी १, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) १, सुरक्षा निरीक्षक १, राखण व पहारा निरीक्षक १ आणि सहायक वाहतूक अधिकारी ४ अशा एकूण ८ अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. तर कर्मचारी वर्गात वाहतूक निरीक्षक ६, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वरिष्ठ लिपिक २१ प्रमुख कारकून ८ कारागिर ‘क’ ३९ आणि सहायक कारागिर १९ जणांना असे एकुण १०५ जणांना पदोन्नती मिळाली आहे.अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही मिळून ११३ जणांना यात समावेश आहे.
पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होणार असून विभागातील कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पडेल, अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील प्रलंबित पदोन्नती आता मंजूर झाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. यंदा अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आल्याने विभागाच्या संघटनात्मक ताकदीत भर पडली आहे.
४० पदोन्नतीचे पदे तांञिक कारणामुळे रखडलेले आहेत तांञिक बाब दूर होताच उर्वरित जणांचा मार्ग देखील मोकळा होईल असे प्रशासनाने कळवले आहे.
नियमानुसार एकूण ११३ जणांना ही पदोन्नती मिळाली असून त्यात अधिकरी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अरुण सिया,
विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग
कोकणात जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातून धावल्या २३० बस
गणपती हा कोकणातील प्रसिद्ध उत्सव आहे. त्यामुळे लाखो कोकणातील भाविक आपल्या गावी कोकणात गेले आहेत. यामुळे राज्यातील अनेक एसटी विभागातील लालपरी कोकणात पाठविण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून देखील लाखो कोकणवासीय कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी कोकणवासीय खूप महीने आधीच आरक्षण देखील करत असतात. दरम्यान नागरिकांना कोकणात जाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून यावर्षी पुणे विभागातील २३० एसटी कोकणात सोडण्यसात आल्या आहेत. दरम्यान कोकणातील प्रवाशांना एकत्र ग्रुपद्वारे गणपती निमित्त गावी जाण्यासाठी महिनाभरापूर्वीच बुकिंग सुरू करण्यात आली होती.