किडनीमध्ये वाढलेला मुतखडा कायमच होईल नष्ट!
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, सतत बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार वाढू लागतात. शरीराला कोणत्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. सतत चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे आरोग्याची नियमित योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. हल्ली अनेकांमध्ये किडनी स्टोनची समस्या वाढू लागली आहे. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात असह्य वेदना होऊ लागतात. या वेदना काही वेळा अतिशय तीव्र असतात. अनेक लोक किडनी स्टोन झाल्यानंतर मेडिकलमधील पेनकिलर किंवा गोळ्यांचे सेवन करतात. मात्र गोळ्यांमुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे किडनी स्टोनचा आकार वाढून पोटात वेदना होऊ लागतात. त्यामुळे मुतखडा झालेल्या व्यक्तींनी जास्त मिठाचे सेवन करू नये. किडनी स्टोनचा आकार वाढल्यानंतर डॉक्टरसुद्धा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही आयुर्वेदिक उपाय करून सुद्धा किडनी स्टोन नष्ट करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात? स्टोन नष्ट करण्यासाठी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
प्रत्येक घरात तुळशीचे एक तरी रोप असतेच. हिंदू धर्मात तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. तुळशीची पाने चावून खाल्यास शरीरातील अनेक गंभीर आजार नष्ट होतील. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे, सोडियम, लोह, कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे किडनी स्टोन नष्ट होतो. मूत्रपिंडात वाढलेले दगड शरीरास हानी पोहचवतात. हे स्टोन कायमचे नष्ट करण्यासाठी तुळशीच्या चहाचे सेवन करावे. तुळशीमध्ये असलेले अँटी-लिथियासिस गुणधर्म किडनीमधील दगड तोडून बारीक बारीक तुकडे करतो, ज्यामुळे लघवीवाटे हे दगड बाहेर पडून जातात. सतत डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा.