तरुण त्वचेसाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळाच्या रसाचे सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला आणि त्वचेला फायदे होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. अनेक महिला,मुली त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट किंवा इतर अनेक ट्रीटमेंट करतात. मात्र या केमिकल ट्रीटमेंटचा फरक अधिककाळ त्वचेवर टिकून राहत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे. त्वचेवर वेगवेगळे प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरी आहारात बदल करून विटामिन सी युक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेला पोषण देण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी आहारात आवळ्याच्या रसाचे सेवन करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात आवळ्याचे सेवन केल्यास त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. आवळ्याचे सेवन केल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणि पिगमेंटेशन दूर होतात. थंडीच्या दिवसांमध्ये काळवंडलेली निस्तेज झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
वय वाढल्यानंतर किंवा शरीरात आवश्यक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासह त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. त्वचा अधिक वयस्कर आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेवर सुरकुत्या येणे, एजिंग साइन दिसणे, बारीक रेषा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. शिवाय तुम्ही आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि त्वचा चमकदार, सुंदर दिसते. आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊन त्वचा चांगली दिसते.
तरुण त्वचेसाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळाच्या रसाचे सेवन
सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स, फोड , मुरूम येण्यास सुरुवात होते. त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर त्वचा निस्तेज होऊन जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स निघून जातात.
वाढत्या वयानुसार त्वचेवर पिग्मेंटेशन, त्वचा काळी पडणे किंवा सुरकुत्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा टाइट होते. याशिवाय तुम्ही आवळ्याचा रस त्वचेवर सुद्धा लावू शकता.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवर पिंपल्स, मुरूम किंवा पुरळ आल्यानंतर त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. शिवाय धूळ, माती इत्यादी हानिकारक घटक त्वचेच्या ओपन पोर्समध्ये तसेच राहतात. अशावेळी आवळ्याचा रस पिऊन तुम्ही त्वचा आतून स्वच्छ करू शकता.