पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पदार्थाचे सेवन
रोजच्या आहारात बदल झाल्यानंतर पचनसंस्था बिघडते. तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन, जंक फूड खाणे, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात गॅस होणे, अपचन झाल्यासारखे वाटणे, गॅस होणे, पोट फुगणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे वेलदोडे. वेलदोड्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी शरीरासाठी प्रभावी आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वेलदोड्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हे विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलदोड्याचे पाणी प्यावे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही.
शरीरात साचून राहिलेली विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे पचनसंस्था बिघडण्यासोबत आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित वेलदोड्याचे पाणी प्यावे. वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे यकृताचे कार्य सुधारते आणि शरीरातील रक्तशुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुम्ही वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब शरीराला हानी पोहचवतो. वेलदोड्यांमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. या पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.
शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा तणाव कमी होत नाही. वाढलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित वेलदोड्याचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे झोपण्याआधी वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे.