रात्री झोपण्याआधी नियमित करा 'या' चहाचे सेवन, शरीराला होतील अनेक फायदे
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. कधी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रोटीनशेक प्यायले जातात. मात्र दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. वाढलेले वजन योग्य वेळी कमी न केल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी अनेक लोक संध्याकाळच्या वेळी जेवण करणे टाळतात. मात्र जेवण न करता उपाशी राहिल्यास शरीराला हानी पोहचू शकते.(फोटो सौजन्य – istock)
बदलेली जीवनशैली, चुकीचा आहार, मानसिक तणाव, झोपेची कमतरता, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. ही चरबी कमी करण्यासाठी आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन न करता शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना रात्री झोपताना कोणत्या पदार्थांपासून बनवलेल्या चहाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चहाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. यामुळे सुटलेले पोट कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल. चहा बनवताना सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी ओतून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा बडिशेप, एक चमचा धने, १ चमचा हळद, आणि ओवा घालून उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून गाळून घ्या. तयार केलेल्या चहाचे रात्री झोपताना नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली बडीशेप आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. उलट्या, मळमळ किंवा पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी बडीशेप खावी. याशिवाय वाढत्या पोट दुखीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. ओव्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील सूज कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इंन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होऊन पोटातील विषारी घटक बाहेर पडून जातात.