दिल्ली बॉम्बस्फोटमधील आरोपी डॉ. उमर उन नबी याच्या पायाचा डीएनए मॅच झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Red Fort Blast : नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (दि.10) भीषण स्फोट झाला. यामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 24 जण गंभीररित्या जखमी झाले. या प्रकरणामध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटमधील (Delhi Blast) या स्फोटामध्ये पीडितांच्या शरीराचे तुकडे हे लांब लांब पर्यंत फेकले गेले. यामध्ये ज्या गाडीतून बॉम्बस्फोट करण्यात आला त्यामध्ये सापडलेल्या एका पायाचा DNA रिपोर्ट समोर आला आहे. यामधून बॉम्बस्फोट कोणी केला हे स्पष्टपणे समोर आले आहे.
दिल्ली बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की, काही मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले होते. हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करुन मृतांची ओळख पटवली. ज्या कारमध्ये स्फोटकं होती, त्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पोलिसांना या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हिल अन् अॅक्सलेटर याच्यामध्ये फक्त एक पाय सापडला होता. या व्यक्तीचे उर्वरित शरीराच्या स्फोटामुळे चिंधड्या झाल्या होत्या. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. या पायाचा डीएनए रिपोर्ट समोर आला आहे. या डीएनए चाचणी केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीमध्ये ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती, ती कार डॉ. उमर उन नबी चालवत होता. फरिदाबाद येथील साथीदार आणि स्फोटकांचा साठा पकडला गेल्यानंतर त्याने घाईगडबडीत हा स्फोट घडवून आणला असावा, असा अंदाज आहे. त्याला मध्य दिल्लीच्या परिसरात स्फोट करायचा होता. त्यासाठी त्याने लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरातून गाडी काढली होती आणि तो मध्य दिल्लीकडे निघाला होता. मात्र, जवळच्याच सिग्नलवर स्फोटके ट्रिगर झाल्याने तिकडेच स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
डॉ. उमर उन नबी त्याची आय 20 कार कोणत्या मार्गाने दिल्लीत घेऊन आला, याचा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने माग काढला. स्फोटाच्या दिवशी ही आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता. उमर उन नवी हा काश्मीरमधील पुलवामा येथे राहणार होता. त्याच्या कुटुंबीयांनी या स्फोटाबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा केला. आमची कार आमच्या घराबाहेरच उभी आहे. आमची कार हरियाणा पासिंगची नव्हती. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही, असे उमरच्या कुटुंबियांनी सांगितले होते.






