दुधातील भेसळ कशी ओळखावी काय होतो शरीरावर परिणाम
अन्नधान्य भेसळ आणि भेसळीचा खेळ देशात एवढा पसरला आहे की, आरोग्य बिघडण्याचा धोका आपल्याला नेहमीच असतो. याबाबत सध्या ताजे प्रकरण आहे ते म्हणजे UP मधील बुलंदशहरचे, जिथे प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आणि जिल्ह्यातील कृत्रिम दूध आणि सिंथेटिक चीज बनवणाऱ्यांवर कारवाई केली आणि बनावट दूध बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक गोदामावर छापा टाकला.
डिसेंबर महिन्यात लग्नाचा मोठा सीझन असतो आणि यावेळी बनावटी दूध, दुधाचे पदार्थ अधिक विकले जात असल्याचे आता समोर आले आहे, जाणून घेऊया प्रकरण आणि आरोग्यावर होणारा परिणाम (फोटो सौजन्य – iStock)
लग्नसराईत अधिक मागणी
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दुधाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, बनावट दूध आणि केमिकलयुक्त चीज बनवण्याचा हा फॉर्म्युला फार जुना आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्किम्ड मिल्क पावडर, रिफाइंड ऑइलचे 20 टिन, सॅकरिन, व्हाईट पेस्ट आणि दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. या गुप्त गोदामांमधून बनावट दूध बनवण्याच्या साहित्याव्यतिरिक्त तीन भेसळ करणारे आरोपीदेखील पकडण्यात आले.
बनावटी दूध कसे तयार होते
बनावटी दूध कसे तयार केले जाते
केवळ एक लिटर केमिकलने 500 लिटर बनावट दूध तयार केले जाऊ शकते, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे, ही बातमी झी न्यूज हिंदीने ब्रेक केली. चरबी नियंत्रित करण्याचा हा एक मार्ग आहे जेणेकरून मशीन ते कॅप्चर करू शकत नाही. बनावट दुधाला खरा गोडवा देण्यासाठी 2 वर्षांपूर्वी कालबाह्य झालेले सिंथेटिक सिरप वापरले जात होते.
दिल्ली आणि एनसीआरमध्ये या खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जात होता. अन्न सुरक्षा विभागाने 4-5 डिसेंबर रोजी यूपीच्या बुलंदशहरमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले. व्यापारी अजय अग्रवाल यांनी अनेक रसायने मिसळून बनावट दूध आणि चीज बनवण्याचा फॉर्म्युला शोधून काढल्याचे उघड झाले.
बनावट सिंथेटिक दूध पिण्याने नुकसान
फेक मिल्क पिण्याचा शरीरावर काय परिणाम होतो
बनावट सिंथेटिक दूध हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे कारण ते डिटर्जंट, युरिया, रिफाइंड तेल आणि पांढरी पावडर अशा अनेक प्रकारच्या रसायनांचा वापर करून बनवले जाते. त्यात नैसर्गिक पोषक तत्वांचा अभाव तर असतोच, पण त्यात असलेली रसायने शरीरासाठी विषारी असू शकतात.
भेसळयुक्त अन्नामुळे वाढत आहे गंभीर आजारांचा धोका; खाण्यापूर्वी घरीच तपासून पाहू शकता शुद्धता
शरीरावर होणारा परिणाम
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.