कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा पांढऱ्या तिळाचे सेवन
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, पचनसंबंधित समस्या इत्यादी कारणामुळे आरोग्यावर हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते. तर खराब कोलेस्ट्रॉल शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर तयार करतो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अर्टरी ब्लॉकेज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणे किंवा हार्ट ब्लॉकेज इत्यादी हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात पांढऱ्या तिळाचे सेवन करावे. पांढरे तीळ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. आयुर्वेदामध्ये पांढऱ्या तिळांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे पांढऱ्या तिळाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पांढऱ्या तिळाचे सेवन कधी करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पांढऱ्या तिळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात नियमित पांढरे तीळ खावेत. पांढऱ्या तिळांमध्ये फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स इत्यादी घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित पांढऱ्या तिळाचे सेवन करावे. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पांढरे तीळ खावेत. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
हल्ली हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाचे कार्य बिघडते आणि हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित पांढऱ्या तिळाचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही पांढऱ्या तिळाचे सेवन करू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी पांढरे तीळ खावेत. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. पांढऱ्या तिळांमध्ये असलेले हेल्दी फॅट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर वजन वाढणे, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पांढरे तीळ खावेत.
रक्तातील वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते. साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून नियमित पांढरे तीळ खावेत. यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.