मधुमेहावर नियंत्रणात मिळवण्यासाठी 'या' पानाचे करा सेवन
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळून डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घ्यावीत. दैनंदिन आहारात अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आहारात कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे, जे शरीराला सहज पचन होतील. मधुमेह झाल्यानंतर कोणत्या हिरव्या पानाचे सेवन करावे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावरील चरबी कायमची होईल कमी! दैनंदिन आयुष्यात फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, राहालं कायम फिट
जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी कढीपत्त्याच्या वापर केला जातो. कढीपत्ता खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते, याशिवाय शरीराला इतरही अनेक फायदे होतात. मधुमेह झल्यानंतर सकाळी उठल्यावर नियमित कढीपत्त्याची २ किंवा ३ पाने चावून खावीत. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित कढीपत्ता खावा. कढीपत्या खाल्यामुळे केसांसह त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्ता खाल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. मधुमेह झाल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना सूज येणे किंवा जखम होण्याची शक्यता असते. या जखमा किंवा सूज लवकर बरी होत नाही. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर साखरयुक्त पदार्थ अजिबात खाऊ नये. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पाने खावीत.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित कढीपत्त्याची पाने किंवा रसाचे सेवन करावे. कढीपत्ता चावून खाल्यानंतर त्यावर गरम पाणी प्यावे, यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्ता खावा.
केवळ दातांसाठीच नाही तर हाडांच्या वेदनेपासूनही सुटका मिळवून देते लवंग, 9 फायदे घ्या जाणून
आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. हा चिकट थर कमी करण्यासाठी आहारात कढीपत्ता खावा. कढीपत्ता खाल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, बायो-ऍक्टिव्ह घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून शरीर स्वच्छ करतात.