कांद्याच्या सालींचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कलर
बदलेली जीवनशैली आणि आहारात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडून जाते. कमी वयातच केस पांढरे होणे, केस अचानक तुटणे, केसांची वाढ थांबणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. शँम्पू, कंडिशनर किंवा हेअर सिरम लावून केसांची काळजी घेतली जाते. पण हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट केसांसाठी काहीवेळा हानिकारक ठरतात. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली कमी वयात अनेकांचे केस पांढरे होऊन जातात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी महिला हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर करतात. मात्र हानिकारक रसायनांपासून बनवलेले हेअर केअर काहीकाळ केस अतिशय काळेभोर आणि सुंदर ठेवतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा एकदा केसांची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांद्याचा सालीचा वापर करून हेअर कलर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा हेअर कलर पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मदत करतो. चला तर जाणून घेऊया हेअर कलर बनवण्याची सोपी रेसिपी.
तडखत्या उन्हामुळे गेलंय चेहऱ्यावरचे तेज? मग झोपण्यापूर्वी करा ‘या’ वस्तूंचा वापर
घरी बनवलेला हेअर कलर मोठ्या वाटीमध्ये घेऊन त्यात खोबऱ्याचं तेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. पातळ मिश्रण ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण केसांवर लावा. हेअर कलर लावल्यानंतर अर्धा ते एक तास केसांवर ठेवून नंतर शँम्पूने केस स्वच्छ करून घ्या. हा नैसर्गिक हेअर कलर केसांसाठी अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे तुमचे केस काळेभोर, घनदाट, लांबसडक होण्यास मदत होईल.