मासिक पाळीतील 'या' त्रासांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
प्रत्येक महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या या पाच दिवसांमध्ये महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात होणारे वेदना, कंबर दुखणे, ओटीपोटात वाढलेल्या वेदना, अति रक्तस्त्राव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय मासिक पाळी येण्याची काही दिवस आधी ब्रेस्टमध्ये वेदना होऊ लागतात. मासिक पाळी आल्यानंतर काहींना पोटात आणि कंबरेमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे महिला दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरते. पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर सामान्यपणे अन्नपचन किंवा गॅस्ट्रिकची समस्या उद्भवली असेल, असे अनेकांना वाटते. पण काही गंभीर समस्यांची ही लक्षणे असू शकतात.(फोटो सौजन्य – istock)
पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अनेक महिला पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर घरगुती उपाय किंवा ओव्हर-द-काउंटर औषधं घेऊन काहीवेळापुरता आराम मिळवतात. मात्र पुन्हा एकदा पोटात आणि कंबरेमध्ये वेदना होऊ लागतात. वयाच्या २५ ते ३० वर्षांमध्ये महिलांना मासिक पाळी, गर्भधारणेची तयारी, हार्मोनल बदल, यूटेरस किंवा अंडाशयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी दरम्यान कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
महिलांच्या शरीरात सतत काहींना काही हार्मोनल बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीराला बऱ्याचदा हानी पोहचते. मासिक पाळी आल्यानंतर पोटाच्या खालच्या भागात वेदना होत असल्यास डीस्मेनोरिया किंवा सामान्य पाळीतील वेदनाची लक्षणे असतात. मात्र पाळीआधी पोटाच्या खालील भागात वेदना होत असतील तर त्यांना एंडोमेट्रायोसिस किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्यावा.
पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना गॅस, अपचन, अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थाचे सेवन करू नये. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचते. या वेदना वात किंवा मलावष्टंभामुळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वेदना सतत होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
मासिक पाळी आल्यानंतर लघवी करताना जळजळ किंवा वेदना होण्याची जास्त शक्यता असते. पोटाच्या खालच्या भागात होणारी वेदना लघवीच्या संक्रमणामुळे उद्भवते. जळजळ, वारंवार लघवी लागणं, तीव्र वास किंवा लघवी करताना अस्वस्थता जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर अंतर्गत स्वचतेकडे जास्त लक्ष देणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.