कोणते आजार ठरतील जीवघेणे
आजकाल बिघडत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे, अनेक धोकादायक आजार (High-Risk Diseases) वेगाने पसरत आहेत. यामुळे मोठ्या संख्येने लोक आपले प्राण गमावत आहेत. जर यापैकी काही आजारांवर वेळेवर उपचार केले तर जीव वाचू शकतात. पण काही इतके धोकादायक असतात की ते जलद मृत्यूला कारणीभूत ठरतात. या प्रकरणांमध्ये, रुग्णाला उपचार घेण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यांना वाचवणे खूप कठीण होते.
अशा उच्च-जोखीम असलेल्या आजारांची नक्की काय नावं आहेत याबाबत आपण अधिक माहिती आजच्या लेखातून घेऊया. मात्र या आजारांची लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क करायला हवा, वेळ घालवल्यास तुम्ही तुमचा जीव गमावू शकता (फोटो सौजन्य – iStock)
कार्डियाक अरेस्ट
कार्टियाक अरेस्ट ठरेल त्रासदायक
सध्या सर्वाधिक ऐकू येणारा सर्वाधिक धोक्याचा आजार म्हणजे कार्डियाक अरेस्ट. कार्डियाक अरेस्ट ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदय अचानक काम करणे थांबवते. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा थांबतो तेव्हा ही स्थिती उद्भवते, ज्यामुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामध्ये, जर रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर तो आपला जीव गमावतो. यामध्ये काही क्षणातच होत्याचं नव्हतं होतं आणि माणूस आपला जीव गमावतो
स्ट्रोक
स्ट्रोक या आजारामध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो. ज्यामुळे त्याच्या पेशी मरायला लागतात. यामध्ये रक्तवाहिन्या फुटतात. जर त्यावर त्वरीत उपचार केले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. स्ट्रोकचे तीन प्रकार आहेत. इस्केमिक स्ट्रोक, हेमोरेजिक स्ट्रोक आणि ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. यापैकी प्रत्येक आजारावर व्यवस्थित लक्ष द्यावे लागते आणि कोणतेही लक्षण जाणवल्यास लगेच यावर ट्रीटमेंट घ्यावी
मानेवर आणि घशात दिसून येतात Kidney Cancer ची लक्षणे, करू नका दुर्लक्ष होईल घात
मेनिन्झायटिस
मेनिन्झायटिस हा एक जीवाणूजन्य आजार आहे जो मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या ऊतींना प्रभावित करतो. हा संसर्ग सामान्यतः बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे होतो. जर त्यावर उपचार केले नाहीत तर जगण्याची शक्यता नाही. मेनिंजायटीसची लक्षणे व्यक्तीचे वय, रोगप्रतिकारक शक्ती आणि जिवाणू किंवा विषाणूजन्य कारणानुसार बदलतात.
सेप्टिसिमिया
सेप्टिसिमियामुळे काय होतं
सेप्टिसेमिया हा एक गंभीर संसर्ग आहे जो रक्तात पसरतो आणि शरीराच्या इतर भागांना नुकसान पोहोचवू लागतो. हा संसर्ग बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकतो. यामध्येही एखाद्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. सेप्सिस संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतो. यामुळे महत्त्वाचे अवयव काम करणे थांबवू शकतात. सेप्सिस सहसा मूत्रपिंडात सुरू होते आणि सेप्सिसची लक्षणे दिसण्यासाठी वेळ लागू शकतो.
रेबीज
रेबीज रोग ठरू शकतो त्रासदायक
रेबीज हा देखील एक विषाणूजन्य आजार आहे, जो प्राण्यांच्या चाव्याद्वारे पसरतो, विशेषतः कुत्रा वा मांजर यांनी चावल्यास याचा अधिक परिणाम दिसून येतो. यामध्ये मेंदू आणि पाठीच्या हाडांवर परिणाम होतो. जर त्यावर उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, लस दिली जाते. कोणताही प्राणी चावल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्वरीत उपाय करावेत त्याकडे दुर्लक्ष करू नये वा घरगुती उपाय करत राहू नये
दैनंदिन आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, हार्ट अटॅकने होईल शरीराचे गंभीर नुकसान
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.