पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक
नेहमीच सर्व महिलांना स्लिम आणि निरोगी शरीर हवे असते. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. सतत काहींना काही हेल्दी पदार्थ खात राहणे, व्यायाम करणे, योगासन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण यामुळे अनेकदा वजन नियंत्रणात राहत नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे वजन वाढत जाते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला काहींना काही उपाय करत असतात. पण पोटांच्या आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून गेले नाहीतर पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवनांवर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. पोटावर वाढलेल्या अतिरिक चरबीमुळे अनेक समस्या उद्भवतात.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लिंबूमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी प्रभावी आहेत. लिंबू आल्याचे पाणी बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात आल्याचा तुकडा टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर आल्याचे पाणी गाळून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. हे ड्रिंक नियमित प्यायल्यास पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म पोटातील घाण स्वच्छ करून पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. लिंबू आल्याचे पाणी प्यायल्यामुळे टॉक्सिन्स निघून जाऊन मेटाबॉलिज्म वाढून पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आजपासून नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक
अनेकांना दैनंदिन आहारात सतत ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने ग्रीन टी चे सेवन केले जाते. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मची पातळी वाढून पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
फायबर युक्त मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेथी दाण्यांचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम रात्री एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: वेलची पाकिटात ठेवल्याने काय होते?
काकडी पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स राहते. काकडीमध्ये असलेले गुणधर्म शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. तर पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुम्ही काकडी पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. हे पाणी बनवण्यासाठी खूप सोपे आहे.