ता : 4 – 7- 2023, मंगळवार
तिथी : संवत्सर
मिती 13, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, दक्षिणायन वर्षा ऋतू, आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा 13:38 नंतर द्वितीया
सूर्योदय : 5:48, सूर्यास्त : 7:05
सूर्योदयकालीन नक्षत्र – पूर्वाषाढा 8:24 नंतर उत्तराषाढा 29:38, योग – ऐंद्र 11:49 नंतर वैधृती, करण- कौलव 13:38, नंतर तैतिल 23:50 पश्चात गरज
सण उत्सव : अशून्य शयन व्रत
राहुकाळ : दुपारी 3:00 ते 4:30
शुभ अंक : 9,3,6
शुभ रत्न : मंगळासाठी मूंगा किंवा प्रवाळ
शुभ रंग : गडद किंवा गुलाबी लाल
२०१५: कोपा अमेरिका कप – चिली देशाने २०१५ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिले विजेतेपद पटकावले.
२००९: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आठ वर्षांच्या बंदनंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.
२००६: स्पेस शटल प्रोग्राम – डिस्कव्हरीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर STS-121 प्रक्षेपित केले.
२००५: डीप इम्पॅक्ट कोलायडर – हा धूमकेतू टेम्पेल १ ला धडकला.
२००४: फ्रीडम टॉवर, न्यूयॉर्क – वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेवर या इमारतीची कोनशिला घातली गेली.
२००४: UEFA युरो कप – ग्रीस देशाने २००४ च्या अंतिम सामन्यात पोर्तुगालचा पराभव करून इतिहासात प्रथमच युरोपियन चॅम्पियन बनला.
१९९८: नोझोमी प्रोब – जपानने मंगळावर प्रक्षेपित केले.
१९९७: पाथफाइंडर – नासाचे मानवविरहित यान मंगळावर उतरले.
१९९५: गोविंद स्वरूप – यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.
१९५०: शीतयुद्ध – रेडिओ फ्री युरोपने प्रथम प्रसारण केले.
१९४७: इंडियन इंडिपेडन्स बिल – भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
१९४६: फिलीपिन्स – देशाला जवळपास ३८१ वर्षांच्या अमेरिकन वसाहतवादी शासनानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.
१९४३: दुसरे महायुद्ध – कुर्स्कची लढाई: इतिहासातील सर्वात मोठी पूर्ण-स्तरीय लढाई आणि जगातील सर्वात मोठीरणगाड्यांची लढाई सुरू झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – सेवास्तोपोल शहराचा वेढा: २५० दिवसांनी वेढा संपला.
१९४१: नाझी सैन्याने पोलिश शास्त्रज्ञ आणि लेखकांची हत्या केली.
१९४१: दुसरे महायुद्ध – रीगा सिनेगॉग्ज हत्याकांड: जर्मन सैन्याने ग्रेट कोरल सिनेगॉग तळघरात ३०० ज्यूं लोकांना बंद करून जाळले गेले.
१९३६: अमरज्योती – चित्रपट प्रदर्शित झाला.
१९१८: पहिले महायुद्ध – हॅमेलची लढाई: ऑस्ट्रेलियन सैन्याने ले हॅमेल शहराजवळ असणाऱ्या जर्मन स्थानांवर यशस्वी हल्ला केला.
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर – यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.
१९०३: डॉरोथी लेव्हिट – मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
१९०३: फिलीपीन-अमेरिकन युद्ध – अधिकृतपणे संपले.
१८८६: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – फ्रांसने अमेरिकेला ही मूर्ती भेट दिली.
१७७६: अमेरिका – देशाने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.
१०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मध्ये त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.
१९८३: अमोल राजन – भारतीय-इंग्लिश पत्रकार
१९७६: दाइजिरो कातो – जपानी मोटरसायकल रेसर (निधन: २० एप्रिल २००३)
१९६८: सायरस पालोनजी मिस्त्री – भारतीय व्यापारी, उद्योगपती (निधन: ४ सप्टेंबर २०२२)
१९५४: देवेंद्र कुमार जोशी – भारतीय नौदलाचे २१वे नौदल प्रमुख
१९२६: विनायक बुवा – विनोदी साहित्यिक (निधन: १७ एप्रिल २०११)
१९१४: पी. सावळाराम – जनकवी भावगीत लेखक (निधन: २१ डिसेंबर १९९७)
१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (निधन: १६ फेब्रुवारी १९९४)
१८९८: गुलझारीलाल नंदा – भारताचे हंगामी पंतप्रधान (निधन: १५ जानेवारी १९९८)
१८९७: अलारी सीताराम राजू – भारतीय कार्यकर्ते (निधन: ७ मे १९२४)
१८८२: लुईस बी. मेयर – एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक (निधन: २९ ऑक्टोबर १९५७)
१८७२: काल्व्हिन कुलिज – अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जानेवारी १९३३)
१८०७: ज्युसेप्पे गॅरिबाल्डी – इटलीचा क्रांतिकारी (निधन: २ जून १८८२)
१७९०: सर जॉर्ज एव्हरेस्ट – भारताचे सर्वेक्षण जनरल (निधन: १ डिसेंबर १८६६)
२०२२: तरुण मजुमदार – भारतीय चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री (जन्म: ८ जानेवारी १९३१)
२०२०: भक्ती चारू स्वामी – कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते (जन्म: १ सप्टेंबर १९४५)
२०१२: हिरेन भट्टाचार्य – भारतीय कवी आणि लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २८ जुलै १९३२)
१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट – कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (जन्म: १४ मे १९०९)
१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार
१९८०: रघुनाथ वामन दिघे – कादंबरीकार (जन्म: २४ एप्रिल १८९६)
१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (जन्म: २ ऑगस्ट १८७६)
१९३४: मेरी क्युरी – पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)
१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: १२ जानेवारी १८६३)
१८३१: जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)
१८२६: जॉन ऍडॅम्स – अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)
१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १७४३)
१७२९: कान्होजी आंग्रे – मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल)