(फोटो सौजन्य: Pinterest)
“देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आपल्या परीने हा प्रकाश आणि आनंदाचा सण खास करण्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी सुरू करतो. भारताच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचा जल्लोष दिसतो, लोक घरातील प्रत्येक कोपऱ्यातून अंधार दूर करण्यासाठी दिवे लावतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की हिमाचल प्रदेशात एक असं गाव आहे, जिथे दिवाळीच्या दिवशी ना फटाके फोडले जातात आणि ना एकही दिवा लावला जातो. हे सर्व एखाद्या परंपरेमुळे नव्हे, तर एका “सती”च्या श्रापामुळे होतं. चला जाणून घेऊ या गावाची ही रहस्यमय आणि भीतीदायक कहाणी आणि तिथे कसे पोहोचता येते.
88 मीटर आत खाणीत बांधल आहे ‘वॉटरफॉल हॉटेल’, 4000 कोटींच्या किमतीत बनवलंय इन्व्हर्टेड ग्राउंडस्केपर
हिमाचलच्या डोंगरात दडलेली भीतीदायक कथा
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेले सम्मू गाव आजही त्या जुन्या घटनेची आठवण जपून आहे. स्थानिक लोककथांनुसार, अनेक शतकांपूर्वी या गावातील एक गर्भवती स्त्री दिवाळी साजरी करण्यासाठी मायके गेली होती. तिचा नवरा स्थानिक राजाच्या सैन्यात सैनिक होता आणि युद्धात त्याचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच ती स्त्री शोकाकुल होऊन गावात परतली आणि नवऱ्याच्या पार्थिवावरून तीव्र दु:खात सती गेली.
मृत्यूपूर्वी तिने गावाला एक भयंकर श्राप दिला
“या गावात कधीही दिवाळी साजरी केली जाणार नाही. जर कोणी केली, तर त्याच्यावर घोर संकट येईल.” तेव्हापासून आजपर्यंत गावात दिवाळी साजरी केली जात नाही. गावकरी मानतात की दिवाळीच्या दिवशी आनंद साजरा केल्यास मृत्यू किंवा मोठं दुर्भाग्य येऊ शकतं.
गावच्या सरपंचीचं मत
सम्मू गावाच्या सरपंच वीणा देवी सांगतात की, “हा प्रथा आजही तंतोतंत पाळली जाते. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी हा श्राप मोडण्यासाठी एक मोठं यज्ञ केलं, पण काहीच फरक पडला नाही.” स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की, दिवाळीच्या दिवशी ते घराबाहेरसुद्धा पडत नाहीत. गाव अंधारात बुडलेलं असतं. काही लोक घरात शांतपणे एक-दोन दिवे लावतात, पण कोणताही उत्सव, मिठाई किंवा सणाचा माहोल नसतो. तरीही त्यांना विश्वास आहे की, एक दिवस हा श्राप तुटेल आणि तेही दिवाळीचा आनंद अनुभवतील.
सतीच्या मूर्तीची पूजा
दिवाळीच्या दिवशी गावकरी फक्त सतीच्या मूर्तीची पूजा करतात. लोकांच्या मते, जर कोणीतरी या गावातून बाहेर जाऊन दुसरीकडे राहत असला तरी हा श्राप त्याचा पाठलाग करतो. असेही म्हटले जाते की, एक कुटुंब गावाबाहेर गेले आणि त्यांनी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या घराला अचानक आग लागली.
या 5 देशात जाऊन भारतीय बनतात श्रीमंत, इथे भारतीय रुपया आहे मजबूत; संपता संपत नाही पैसा
सम्मू गावाला कसे जायचे
स्थान: सम्मू गाव, भोरंज पंचायत, हमीरपूर जिल्हा, हिमाचल प्रदेश.
अंतर: हमीरपूर शहरापासून अंदाजे २५ कि.मी.
प्रवास मार्ग:
हिमाचलच्या निसर्गसौंदर्यात दडलेले हे सम्मू गाव आजही एका सतीच्या श्रापामुळे अंधारात बुडालेलं आहे. काळ कितीही पुढे गेला तरीही या परंपरेचा प्रभाव अजूनही कायम आहे. मात्र गावकऱ्यांना आशा आहे की एक दिवस हा श्राप संपेल आणि त्यांच्या घरातही पुन्हा एकदा प्रकाशाचा सण उजळून निघेल.