(फोटो सौजन्य: istock)
“दिवाळीच्या शुभ सणात भारतात लोक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतात, सोनं-चांदी, वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन सणाचा आनंद साजरा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात काही असे देश आहेत जिथे तुम्ही परदेश फिरायला जाऊ शकता आणि तिथे तुमची भारतीय रुपये इतकी ‘स्ट्राँग’ होते की तुम्हाला स्वतःला श्रीमंत असल्याची जाणीव होते! होय, असे काही देश आहेत जिथे ५० ते ६० हजार रुपयांत तुम्ही सुंदर पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. चला मग जाणून घेऊ या अशा देशांबद्दल जिथे कमी खर्चात जास्त मजा करता येते.
इंडोनेशिया – 1 INR = 193 IDR
इंडोनेशिया हा हजारो बेटांनी बनलेला देश आहे, जिथे सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे आणि समृद्ध संस्कृती पाहायला मिळते. इथले हॉटेल, अन्न आणि प्रवास सगळं खूप स्वस्त आहे. स्थानिक बाजारात खरेदी, पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद — हे सर्व तुम्ही खूपच कमी खर्चात घेऊ शकता. आराम आणि रोमांच यांचा संगम असलेला हा देश पर्यटकांसाठी स्वर्ग आहे.
व्हिएतनाम – 1 INR = 299 VND
व्हिएतनाम हा बजेट-फ्रेंडली आणि उत्साही देश आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत इथल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. इथले स्ट्रीट फूड, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिंग सर्वच परवडणारे आहे. भारतीय रुपया इथे जास्त किमतीचा असल्याने तुमचा खर्च कमी आणि अनुभव जास्त होतो. इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी उपक्रम यांचे उत्तम मिश्रण इथे मिळते.
श्रीलंका – 1 INR = 3.46 LKR
भारताच्या जवळ असल्याने श्रीलंका हा प्रवासासाठी सर्वात सोयीचा आणि परवडणारा देश आहे. सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार डोंगर आणि प्राचीन सांस्कृतिक स्थळे यामुळे हा देश एक परिपूर्ण पर्यटनस्थळ ठरतो. भारतीय पर्यटकांसाठी येथे अन्न, प्रवास आणि निवास खूपच स्वस्त आहे. त्यामुळे निसर्ग, संस्कृती आणि इतिहासाचा आनंद घेण्यासाठी श्रीलंका उत्तम पर्याय आहे.
नेपाळ – 1 INR = 1.60 NPR
भारतीय पर्यटकांसाठी नेपाळ म्हणजे जवळचं आणि खिशाला हलकं ठिकाण. हिमालयाचे मनोहर दृश्य, ट्रेकिंग ट्रेल्स आणि धार्मिक स्थळे यामुळे नेपाळची सफर खास ठरते. इथे राहणं, खाणं आणि फिरणं सर्वकाही कमी खर्चात होतं. कपल्ससाठी हे एक लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशनसुद्धा आहे.
भारतातील 5 धन्वंतरी मंदिर जिथे धनत्रयोदशीला होते अनोखी पूजा, धनाच्या सर्व इच्छा होतात इथे पूर्ण
कंबोडिया – 1 INR = 46.85 KHR
कंबोडिया हा समृद्ध इतिहास आणि प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध देश आहे. प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर, स्थानिक बाजारपेठा आणि गावांची साधी जीवनशैली पाहण्यासाठी हा देश अप्रतिम आहे. इथले हॉटेल, अन्न आणि प्रवासाचे दर अतिशय परवडणारे आहेत. त्यामुळे बजेटमध्ये जग पाहायचं असेल तर कंबोडिया नक्कीच सर्वोत्तम पर्याय ठरेल.
धनतेरसच्या या शुभ प्रसंगी फक्त सोनं-चांदीत गुंतवणूक न करता, आयुष्यात आनंदाचे अनुभव जमा करण्याचाही विचार करा. हे देश तुमच्या बजेटमध्ये राहून अमूल्य आठवणी देऊन जातील!