पूर्वीकाळी जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा.
पण आता केळीच्या पानाचा वापर खूप कमी प्रमाणात जेवणासाठी केला जातो. आता प्लास्टिक आणि थर्माेकॉला जास्त पंसती मिळत आहे. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळपान आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या अंत्यत उपयुक्त आहे. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.
केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.
ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे.
Web Title: Do you eat banana leaves because be sure to read the many benefits of eating on a banana leaf nrrd