बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पुरीसोबत श्रीखंड खायला खूप जास्त आवडते. दही, दूध आणि साखरेचा वापर करून बनवलेले श्रीखंड चवीला अतिशय सुंदर लागते. घरात कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यास श्रीखंड आणले जाते. पण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील गोड पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्षार श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. श्रीखंड बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीत तुम्ही श्रीखंड बनवू शकता. कायमच शेवयांची खीर, गुलाबजाम किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही पुरीसोबत खाण्यासाठी चविष्ट केशर श्रीखंड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)