(फोटो सौजन्य - Social Media)
पहिली भेट म्हणजे समोरच्याला इम्प्रेस करण्याची सगळ्यात महत्वाची संधी असते. असे म्हणता येणार नाही कि ही शेवटची संधी असते. पण त्या इतकीच महत्वाची असते. Valentine Week जवळ आला आहे. आता लोकांच्या प्रेमाला उधाण आहे. अशामध्ये तुम्हीही तुमच्या प्रेमाच्या नौकेला किनाऱ्याचा आधार देऊ शकता आणि जर तुमच्या नौकेचा डेस्टिनेशन तुम्हाला ठाऊक असेल तर वाट कसली पाहताय? या Valentine Day ला होऊन जाऊदे काय ते. म्हणजेच तुमच्या क्रशला तुमच्या मनातले सांगायची वेळ आली आहे. पण ते चॅट किंवा कॉलवर सांगणे फार मोठा मूर्खपणा ठरेल.
या गोष्टी आयुष्यातील फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या भेटून सांगणे कधीही उत्तम असते. मुळात, त्या वेळेवर सांगणे फार महत्वाचे असतात. नाही तर तुमच्या नौकेचा डेस्टिनेशन आणखीन कुणाच्या तरी नौकेचादेखील डेस्टिनेशन असू शकतो आणि त्याने तो डेस्टिनेशन गाठला की समजा तुमच्याकडे दोनच पर्याय उरतायत. एक तर नौकेला बुडू द्या नाही तर डेस्टिनेशन बदला. त्यामुळे जास्त वेळ न घालवता तुमची डेट फायनल करा.
क्रशला डेटवर घेऊन जात आहात तर चांगल्या जागेची निवड करा. अशी जागा निवडा जिथे जास्त गर्दी नसेल. एक सुंदर पार्क किंवा कॅफे, अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या भावना सहजरित्या आणि शांतरित्या मांडू शकता. पहिली भेट कधीही एकमेकांना समजण्याची महत्वाची संधी असते त्यामुळे जागा जितकी शांत तितके उत्तम असते. दोघांच्या सोयीनुसार वेळ ठरवा. डेटसाठी जास्तच उशीर संध्यकाळी गेलात तर लवकर घरी जाण्याच्या घाईने सर्व प्लॅनवर पाणी फेरले जाईल. त्यामुळे वेळ अशी निवडा, जिथे दोघांकडे बोलण्यासाठी आणि एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी फार वेळ असेल. घाईमध्ये केलेली चर्चा वाईट इम्प्रेशन देते.
किमान तुमच्या पहिल्या भेटीत तरी जितके उत्तम लुक करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करा. सुंदर कपडे परिधान करा. एकदम टापटीप दिसा. तुमच्या पर्सनॅलिटीनुसार आऊटफिटची निवड करा आणि त्यांना परिधान करा. व्यक्तीचं पहिलं इम्प्रेशन व्यक्तीचा लुक असतो. ह्युमर असणे गरजेचे असते. परंतु, जास्त जोकर बनण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. हास्य विनोदांनाही एक मर्यादा ठेवा. बोलण्यात आत्मविश्वास ठेवा. क्रशच्या मागील आयुष्याविषयी बोलणे टाळा. स्वतःच्या भावनांना जास्त महत्व द्या आणि तितकेच महत्व देऊन समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या. डेटमध्ये स्वतःला पूर्णपणे तुम्हा दोघांमध्येच गुंतवा. इतर काम करणे टाळा.