सुंदर त्वचेसाठी नियमित करा 'ही' योगासने
सर्वच महिला आणि मुलींना नेहमीच छान आणि सुंदर दिसायचं असत. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी चेहऱ्यावर फेसपॅक लावणे, तर कधी चेहऱ्यावर घरगुती उपाय केले जातात. पण हे उपाय करूनसुद्धा काहीवेळा त्वचा सुंदर आणि तरुण दिसत नाही. वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. वातावरणात निर्माण झालेल्या आद्र्रतेमुळे त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ केली नाही तर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्स आल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती, केमिकल उपाय करण्याऐवजी नियमित सकाळची उठल्यानंतर योगासने करावीत. योगासने केल्यामुळे शरीरासह त्वचेला सुद्धा फायदे होतात. फेस योगा केल्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यासाठी मदत होते. नियमित योगासने केल्यामुळे चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारून त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. त्यामुळेच आज सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोणती योगासने करावे? योगासने केल्यामुळे काय फायदे होतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: गॅससमोर उभे राहूनही दूध उकळते का? हा उपाय करा, स्वयंपाकघरात उभे राहण्याची भासणार नाही गरज
हलासन केल्यामुळे त्वचेसह शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्वचेचा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी नियमित हलासन करावे. हलासन करताना पाठीवर झोपून दोन्ही पाय एकमेकांवर ठेवा. त्यानंतर डोकं मागे घ्या. हलासन केल्यामुळे थायरॉईड ग्रंथी सक्रिय राहून हार्मोन्स संतुलित राहतात. तसेच हे आसन नियमित केल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.
भुजंगासन केल्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांसोबतच त्वचेच्या रक्तवाहिन्यासुद्धा सक्रिय राहतात. भुजंगासन करताना पोटावर झोपून शरीराचा वरचा भाग हातांच्या मदतीने वर उचला. हे आसन नियमित केल्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते.
सुंदर त्वचेसाठी नियमित करा ‘ही’ योगासने
ताडासन करताना सरळ उभे राहून हात वरच्या दिशेने ओढा. यामुळे संपूर्ण शरीर ताणले जाते आणि शरीर लवचिक होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित ताडासन करावे. ताडासन केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते.
हे देखील वाचा: 5 नॉनव्हेज पदार्थांमध्ये खच्चून भरलंय प्रोटीन, जास्त खाणे मात्र ठरेल जीवघेणे!
शवासन केल्यामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो. हे आसन करताना एक जागेवर काही वेळ दीर्घ श्वास घेऊन काहीवेळ झोपून राहा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत होण्यास मदत होईल. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे त्वचा आणखीन सुंदर आणि चमकदार दिसेल.