फोटो सौजन्य - Social Media
आपण आधीपासून ऐकत आलो असेल की लहान बाळाला दुधाने स्नान घातले तर त्याचा रंग निखरतो. त्वचेच्या रंगात चमक येते आणि त्वचेचा रंग आणखीन उजाळतो. एकंदरीत, आपण आपल्या वाडवडिलांकडून या गोष्टी ऐकत आलो आहोत. फक्त ऐकत नाही तर घरातील लहान मुलांना दुधाने अंघोळ घालताना अनेकदा पाहिले ही असेल. पण दुधाने अंघोळ घालणे किंवा गर्भावस्थेत असताना आईला दूध मलाई खाऊ घालणे, जेणेकरून बाळ रंगाने गोरा होईल. असे म्हणण्यात किती तथ्य आहे? चला तर मग जाणून घेऊयात.
बाळाचे रंग पूर्णपणे बाळाच्या गुणसूत्रांवर आधारित आहे. बाळाचे आईबाप जर रंगाने गोरे असतील तर बाळही त्यांच्यावरच जाण्याची शक्यता अपार असते. त्यामुळे दूध आणि मलाई खाल्ले तर बाळ गोरा होईल. बाळाच्या त्वचेत वेगळाच निखार असेल असे मानाने म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. पण सत्य गोष्ट अशी आहे की दूध आरोग्यसाठी उत्तम आहे. त्यामुळे गर्भावस्थेत असताना आईने जर दूध आणि मलाईसारखे पौष्टिक पदार्थ खाल्ले तर त्याचा फायदा गर्भाला म्हणजेच होणाऱ्या बाळालाच होणार आहे. गर्भावस्थेत जर आईने असे पौष्टिक पदार्थ खाल्ले तर बाळ तंदरुस्त होते. बाळाचे आरोग्य उत्तम राहते. पण त्याचे रंगरूप दूध आणि मलाई ठरवत नसून आई बापाचे गुणसूत्र ठरवतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या होणाऱ्या बाळाला गोरा करण्यासाठी दूध आणि मलाई खात आहात तर तुमचे ध्येय प्रचंड चुकत आहे. याने रंग नाही तर तुमच्या बाळाला तंदरुस्ती मिळणार आहे.
काही जण आपल्या बाळाची त्वचा उजळवण्यासाठी बाळाला दुधाने अंघोळ घालतात. अशानेही त्वचेच्या रंगरूपात काहीही फरक पडणार नाही आहे. मुळात, बाळाला दुधाने अंघोळ घालणे चांगली गोष्ट आहे पण येथे ध्येय चुकतेय. दुधाने अंघोळ घातल्यास त्वचेला आराम मिळेल. तसेच त्वचेसंबंधीत इतर आजार सुधारतील. परंतु, लहान बाळाच्या बाबतीत काही करण्याअगोदर आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम ठरेल. म्हणून अशा गोष्टी सल्ल्याशिवाय करण्या टाळले तरच उत्तम असते. काही काही त्वचेला या गोष्टी सहन होत नाहीत. त्यामुळे डॉक्टर जे सांगतील तसे करणेच योग्य ठरते. अशा प्रकारे, दूध हे शरीरासाठी चांगलेच आहे पण त्याने व्यक्ती गोरा होतो असे मानाने हे योग्य नाही.