पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा पुदिन्याच्या पानांचा फेसपॅक
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. याशिवाय बऱ्याचदा तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, मुरूम किंवा फोड त्वचेचे सौदंर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. याशिवाय कधी फेसपॅक लावणे तर कधी फेसमास्क लावून त्वचा सुंदर आणि चमकदार केली जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. यामुळे चेहऱ्यावर कोणतेही प्रॉडक्ट लावताना योग्य काळजी घ्यावी. बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर चेहऱ्यासाठी जास्त करू नये.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्यावर वाढलेले ब्लॅकहेड्स किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. कारण घरगुती पदार्थ त्वचा आतून स्वच्छ करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिन्याच्या पानांचे सेवन केले जाते. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करून शरीरात ओलावा कायम टिकून राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होईल.
पुदिन्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय केळ्यांमध्ये विटामिन ए, बी, सी इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे पुदिन्याच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि डागविरहित होईल. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने आणि केळ्याचे तुकडे घेऊन बारीक पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले डाग आणि पिंपल्स कमी होतील. हा उपाय नियमित केल्यास त्वचा आतून स्वच्छ होईल आणि पिंपल्स कमी होतील.
लिंबामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आतून उजळदार करण्यासाठी मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि मुरुमांनी भरलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या सालीचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. पुदिन्याच्या पानांचा फेसपॅक बनवताना सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने घेऊन त्यांची बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.