प्रोटीन युक्त मुगाची डाळ
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वाढलेलं वजन आणि कमी झालेले वजन दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराचे वजन कमी होणार नाही जास्त होणार नाही. निरोगी आणि आजारामुक जीवन जगण्यासाठी आहारात प्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येणारे पदार्थ म्हणजे अंडी, चिकन, मटण, मासे. मांसाहारी जेवण करणाऱ्या लोकांच्या आहारात या पदार्थांचा अधिक समावेश असतो. पण शाहाकारी व्यक्तींना नेमकं आहारात प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावे हेच सुचत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चिकन , मटण व्यतिरिक्त प्रोटीनसाठी आहारात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
मुगाच्या डाळीचा वापर प्रामुख्याने गोड वरण किंवा लाडू बनवण्यासाठी केला जातो. मुगाची डाळ पचनास हलकी असल्यामुळे लहान मुलांच्या आहारातसुद्धा तुम्ही ही डाळ वापरू शकता. 100 ग्रॅम मूग डाळमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे शाहाकारी पदार्थ जेवणाऱ्या व्यक्तींनी आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. हाडे आणि स्नायूंच्या विकासासाठी मुगाची डाळ उत्तम आहे. जिम किंवा व्यायाम करण्याऱ्या व्यक्तींनी आहारात मुगाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत.
हे देखील वाचा: सतत मोबाईल चेक करण्याची सवय सोडायची आहे का ? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मूग डाळ सहज पचन होते. या डाळीचे सेवन केल्यामुळे कधीच पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवत नाहीत. तसेच पोट स्वच्छ राहते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. यामुळे अनेक समस्या दूर होतात.
मधुमेह असलेल्या किंवा मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यानंतर आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाच्या डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
हे देखील वाचा: लोकरीचे कपडे स्वच्छ करताना लक्षात ठेवा या गोष्टी
आजारी पडल्यानंतर किंवा इतर वेळी थकवा, अशक्तपणा जाणवल्यावर आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. या डाळीमध्ये अनेक प्रकारचे विटामिन आणि मिनरल्स आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. मुगाच्या डाळीमध्ये विटामिन बी, सी आणि ई इत्यादी अनेक घटक असतात. शाहाकारी व्यक्तींसाठी मुगाची डाळ उत्तम पर्याय आहे.