सध्या थंडीची चाहूल लागल आहेत त्यामध्ये स्वेटर, कानटोपी घालून चुलीसमोर बसणे अनेकांना आवडते. हिवाळ्यात गरम पदार्थ खावेसे वाटतात. वातावरणामूळे शरीरात उष्णता रहावी यासाठी डॉक्टरही गरम पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. मुळा हा साधारणपणे पराठा किंवा सॅलडमध्ये खाल्ला जातो. पण अनेकांना मूळा आवडत नाही. अनेक कारणे देऊन लोक मूळा खायला नकार देतात. पण तुम्हाला माहित आहे का की मूळा तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. मुळ्याच्या सेवनाने तुम्ही अनेक मोठ्या आजारांवर नियंत्रण मिळवू शकता.
रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढते आणि इन्सुलिन कमी होते तेव्हा मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेह टाईप-१, टाईप-२ हा आजार वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातकही ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मुळा हे एका औषधाप्रमाणे काम करते.
पचन प्रक्रियेला गती देण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी देखील मदत करू शकते.
मुळ्यामध्ये असे गुणधर्म असतात जे पाण्यासोबत मिक्स झाल्याने आयसोथियोसायनेटमध्ये मोडतात. ज्यामुळे शरीरातील कँसरच्या गाठी बाहेर पडण्यास व शरीरात पसरण्यास मदत होते.






