त्रिफळाचा वापर कसा करावा
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यावर त्याचा लगेच परिणाम दिसून येतो. पोटासंबंधित आजार होणे, अपचन, बद्धकोष्ठता, मूळव्याध इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर काहीवेळा दुर्लक्ष केलं जात, मात्र आजार वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे आजारांची छोटी लक्षणे जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर काही लोक कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्यास प्राधान्य देतात, मात्र पुन्हा एकदा त्रास होण्यास सुरुवात होते. पोट स्वच्छ नाही झालं तर सतत पोटात दुखणे, भूक न लागणे, जेवलेले अन्नपदार्थ न पचणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांमुळे बद्धकोष्ठता, मुळव्याधाचा त्रास होण्यास सुरुवात होते.
हे देखील वाचा: स्नायूंच्या मजबूत वाढीसाठी आहारात करा ‘या’ शाहाकारी पदार्थांचा समावेश, रोगप्रतिकारकशक्तीत होईल वाढ
बद्धकोष्ठतेची कारण:
आहारामध्ये फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे, शारीरिक हालचाली न करणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, चुकीच्या वेळी जेवणे इत्यादी चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. तसेच सतत घेतले जाणारे पेनकिलर आणि अँटासिड्स यांच्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आयबीएस, मधुमेह आणि थायरॉईड हे आजार झाल्यानंतर शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
त्रिफळाचा वापर कसा करावा
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. सतत डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्यामुळे हा आजार वाढण्याची भीती असते. अनेकांना डॉक्टरांनी दिलेली औषध खाल्ल्यानंतर आणखीन त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात त्रिफळाचे सेवन करावे. त्रिफळा ही आयुर्वेदिक वनस्पतींपासून जेवणातील पदार्थांमध्ये वापरली जाते. त्रिफळा खाल्ल्यामुळे पोट आणि आतडे स्वच्छ होऊन पचनक्रिया सुधारते. जेवलेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. गॅस आणि ॲसिडीटी इत्यादी रोजच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात त्रिफळाचे सेवन करावे.
हे देखील वाचा: लॅपटॉप, मोबाईल वापरून डोळे दुखतायत? मग नियमित करा ही योगासने, डोळ्यांच्या त्रासापासून मिळेल सुटका
बाजारामध्ये त्रिफळा सहज उपलब्ध होतात. त्रिफळा एक दिवस उन्हामध्ये सुकवून त्यानंतर त्यांची बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर किंवा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून प्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारून शरीरालासुद्धा अनेक फायदे होतील. हे चूर्ण नियमित खाल्ल्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन तुम्हाला बरे वाटेल.