पाठ मानेच्या वेदना कमी करण्यासाठी नियमित करा योगासने
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये पाठ आणि मानदुखीची समस्या उद्भवू लागली आहे. कारण जीवनशैलीतील बदल, सतत मोबाईल लॅपटॉपचा वापर, एका जागेवर बसून तासनतास काम इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे धावपळीच्या जीवनशैलीतून शरीरासाठी वेळ देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा चालल्यामुळे पाठ आणि मानेमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदना काहीवेळा असह्य होतात, ज्यामुळे खाली बसल्यानंतर किंवा वर उठल्यानंतर पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. जगभरातील लाखो लोक पाठ आणि मानेच्या वेदनेने त्रस्त आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणाऱ्या समस्या पुढे जाऊन मोठ्या होतात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाठ आणि मानेमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी नियमित कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही योगासने नियमित केल्यास महिनाभरात फरक दिसून येईल.(फोटो सौजन्य – istock)
कोलेस्ट्रॉलने भरलेल्या रक्तवाहिन्या कायमच्या होतील स्वच्छ! नियमित खा ‘ही’ फळे, हृदय राहील मजबूत
सकाळी उठल्यानंतर कामाच्या धावपळीमधून थोडासा वेळ शरीरासाठी देणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित उठल्यानंतर योगासने आणि व्यायाम करावे. भुजंगासन करताना सगळ्यात आधी पोटावर झोपा आणि दोन्ही हातांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग हळूहळू वर उचला. हे आसन करताना पाठ वाकली जाते, ज्यामुळे पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. हे आसन नियमित सकाळी उठल्यानंतर केल्यास पाठदुखीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल.
मर्कटासन आसन केल्यामुळे पाठ आणि मानेच्या स्नायूंना आराम मिळेल. याशिवाय मानेमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल. मर्कटासन करताना सगळ्यात आधी पाठीवर झोपावे. त्यानंतर हळूहळू गुडघे वाकवून छातीजवळ ओढावे. त्यानंतर डावीकडे व उजवीकडे झोका घ्यावा. हे आसन करताना संपूर्ण शरीराची आणि पाठ, मानेची हालचाल होते, ज्यामुळे वेदनांपासून आराम मिळतो.
Endometriosis: मासिक पाळीच्या दुखण्यापेक्षा गंभीर समस्या, एंडोमेट्रिओसिस म्हणजे नक्की काय
दीर्घकाळ निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. योगासने केल्यामुळे शरीराची हालचाल होते, ज्यामुळे स्नायूंवरील तणाव कमी होतो. गोमुखासन करताना सगळ्यात आधी हात डोक्यावरून मागे घेऊन जा आणि दुसरा हात खालच्या बाजूने पाठीवर घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे पाठ आणि मानेवरील स्नायू रिलॅक्स होतील.
पाठदुखीसाठी काही प्रभावी योगासन कोणते आहेत?
ताडासन, मार्जर्यासन, अधोमुख स्वानासन, भुजंगासन ही आसन नियमित केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
पाठ आणि मानदुखीसाठी मी किती वेळा योगा करावा?
दररोज १०-१५ मिनिटे सौम्य योगाभ्यासाने सुरुवात करा आणि जसजसे तुम्हाला आराम मिळेल तसतसा कालावधी हळूहळू वाढवा. जर तुम्हाला सराव करताना काही वेदना जाणवत असतील तर थांबा आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
ताण-संबंधित पाठ आणि मानेच्या दुखण्यावर योग मदत करू शकतो का?
हो, योगामध्ये श्वास घेण्याच्या तंत्रांचा आणि सजगतेच्या पद्धतींचा समावेश आहे ज्यामुळे ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते, जे बहुतेकदा पाठ आणि मानदुखीचे कारण असतात.