ब्रा वापरणे किंवा न वापरणे ही तुमची चॉईस आहे. पण ब्रा न घातल्याने तुमच्या शरीरात कोणते बदल घडू शकतात. ब्रा वेगवेगळ्या शेप्स आणि साईजमध्ये उपलब्ध असते तरीही ब्रा वापरणे हे बंधनात अडकण्यासारखे वाटते. पण काहीही असले तरी ब्रा वापरणे खूप गरजेचे असते. कारण ब्रा नाही वापरली तर तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात जे तुम्हाला कधीच आवडणार नाहीत.
मान दुखू शकते
ज्या महिलांचे स्तन मोठे असतात त्यांना स्तनांना सावरण्यासाठी ब्रा ची गरज अधिक असते. तुमच्या स्तनांच्या कपचा आकार जास्त मोठा असेल तर मानेवर अधिक जोर येतो आणि त्यामुळे मान दुखण्याचा त्रास अधिक होण्याची शक्यता असते. याशिवाय खांद्याचे दुखणेही यामुळे उद्भवू शकते. त्यामुळे ब्रा घालणे सोडणे अशा महिलांना त्रासदायक ठरू शकते. वास्तविक अनेक जण स्तनांशी निगडीत व्यायाम, ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी याबाबतही चर्चा करतात पण त्याहीपेक्षा योग्य फिटिंगची ब्रा तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरते. किमान जितका वेळ तुम्ही घराबाहेर आहात आणि काम करत आहात तोपर्यंत तरी तुम्ही ब्रा घालणे उत्तम आहे. ब्रा केवळ रात्री झोपताना काढून ठेवणे योग्य आहे.
शरीराच्या पोश्चरवर फरक पडू शकतो
ब्रा घातली नाही तर तुमच्या शरीराच्या पोश्चरवरही फरक पडतो. हेदेखील तुमच्या स्तनांच्या वजनावर निर्धारित आहे. लहान स्तन असणाऱ्या महिलांना याचा जास्त त्रास होत नाही. मात्र मोठे स्तन असणाऱ्या महिलांना मात्र नक्कीच याचा त्रास होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, लहान स्तन असणाऱ्या महिलांना ब्रा न घालण्याचा त्रास होत नाही. अशा महिलांनाही पोश्चरचा त्रास होऊ शकतो. हे ग्रॅव्हिटीमुळे होते, कारण ग्रॅव्हिटीमुळे आपले खांदे खाली वाकू लागता. अशा बाबतीत ब्रा महिलांना अधिक सपोर्ट देते आणि हाडांच्या समस्या दूर राखण्यास मदत करते. त्यामुळे सहसा ब्रा घालणे टाळू नका. तसंच कोणत्या ब्रा मुळे नुकसान होते हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे.
व्यायाम करताना स्तनांना दुखापत होऊ शकते
तुम्ही ब्रा न घालता व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर असा विचारही करू नका. असे केल्यामुळे व्यायाम करताना स्तनांना त्रास होऊ शकतो आणि ज्या महिलांचे स्तन मोठे आहेत, त्यांच्या ब्रेस्ट टिश्यूंमध्येही दुखापत होऊ शकते. कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करताना स्तनांची हालचाल ही होतेच. त्यामुळे ब्रा न घालता व्यायाम केल्यास, तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसंच व्यायाम करताना शरीराची हालचाल अधिक होते आणि स्तनांचीही. अशावेळी स्पोर्ट्स ब्रा ही अधिक फायदेशीर ठरते. तुम्हाला नेहमीची ब्रा वापरायची नसेल तर तुम्ही अशावेळी स्पोर्ट्स ब्रा चा उपयोग करून घ्या.
ब्रेस्ट सॅगिंगची होऊ शकते समस्या
जसे आम्ही वर म्हटले की, ग्रॅव्हिटीचा परिणाम हा स्तनांवर होत असतो आणि ब्रा अधिक काळ घातल्यास, ब्रेस्ट सॅगिंगच्या समस्येला महिलांना सामोरे जावे लागते. अधिक मोठ्या स्तनांच्या महिलांना नेहमी ब्रेस्ट सॅगिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे ब्रा न घालता वावरल्यास, या गोष्टींना अधिक प्रोत्साहन दिल्यासारखे होते. यामुळे स्तनांमध्ये दुखणे आणि सॅगिंग वाढते. असं अजिबात नाही की, तुम्ही कायम ब्रा घालून राहायला हवे. पण सतत ब्रा काढून वावरणेही योग्य नाही. याचा समतोल राखता आला पाहिजे.