लिव्हर सडण्याची भीती होईल कायमची नष्ट! दैनंदिन आहारात हावर्ड डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' पदार्थांचे करा सेवन
कायमच निरोगी आणि सुधृढ राहण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारात फळे, भाज्या इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. पण हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. सतत जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतो. याशिवाय रक्त शुद्ध करणे, पचनक्रिया सुधारणे, शरीरात ऊर्जा टिकवून ठेवणे इत्यादी अनेक कामे लिव्हर करतो. पण दैनंदिन आहारात सतत बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागतात. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी वाढू लागते.(फोटो सौजन्य – istock)
फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हर आतून पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय सतत मद्यपान केल्यामुळे लिव्हरमध्ये पाणी जमा होते. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला लिव्हरचे कार्य कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हरसंबंधित कोणतीही समस्या कधीच उद्भवणार नाही.
रोजच्या आहारात सतत चायनीज किंवा इतर शरीरास घातक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन न करता ग्रिल्ड चिकन, क्विनोआ आणि रोस्टेड भाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील. याशिवाय क्विनोआमध्ये भरपूर फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. लिव्हरसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आजारांपासून रोस्टेड भाज्यांचे सेवन करावे.
नियमित आजारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते आणि लवकर भूक लागत नाही. आहारात डाळ भात, बीट कोशिंबीर किंवा दालखिचडी खाल्यास शरीरातील निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून निघेल. बीट खाल्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते. दह्यातील प्रोबायोटिक्स शरीरात चांगल्या बॅक्टरीया वाढवण्यास मदत करतात.
अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात आंबवलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आहारात इडली, डोसा, उत्त्पम इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स लिव्हर आणि मेंदूला पोषण देतात. याशिवाय शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात सफरचंद खावे.
यकृताचे कार्य:
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य यकृत करते.अन्न पचनासाठी आवश्यक असलेले पित्त तयार करते आणि शरीराला ऊर्जा देते.
यकृताला हानी पोहोचवणारे घटक:
यामुळे यकृताला इजा होते आणि सूज येते. हिपॅटायटीस बी आणि सी सारखे दीर्घकाळ चालणारे संसर्ग यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. काही औषधांच्या जास्त सेवनाने यकृताला हानी पोहोचू शकते.
यकृताचे आरोग्य कसे जपावे?
भरपूर फळे, भाज्या आणि पातळ प्रथिने (मासे, कोंबडी) खा. सकाळी कोमट लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. मद्यपान टाळल्याने यकृताला दुरुस्त होण्यास मदत होते.