पहाटे 3 ते 5 च्या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर शरीरातील दिसून येतील 'हे' मोठे बदल
दिवसाभरातील कामाच्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. पण कायमच निरोगी राहण्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे. शरीराला आरामाची खूप जास्त गरज असते. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साहाने झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जातो. पण सकाळी उठल्यानंतर शरीरात वारंवार थकवा जाणवत असेल तर झोपेच्या वेळात बदल करणे आवश्यक आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यनत सगळेच रात्री झोपण्याच्या वेळेत मोबाईल, लॅपटॉप किंवा गेम खेळत राहतात. यामुळे झोपेच्या चक्रात अनेक बदल होतात. झोपेची वेळ निघून गेल्यानंतर लवकर झोप येत नाही. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल उपयुक्त, जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत
पहाटे लवकर उठल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अनेकांना पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान उठण्याची सवय असते. सकाळी सूर्य उगवण्याच्याआधी उठल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे मानसिक आरोग्य स्थिर राहते आणि शारीरिक आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. रात्रभर जागून मोबाईल पाहण्यापेक्षा झोप घेणे जास्त गरजेचे आहे. झोपल्यामुळे शरीराला आराम मिळतो.
पहाटे लवकर उठल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. याशिवाय मन विचलित होत नाही. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भावनांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. नधारणा, श्वसनप्रक्रिया किंवा माइंडफुलनेस इत्यादी व्यायाम प्रकार केल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवसभर शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी शांत आणि आरामदायी झोप घेणे गरजेचे आहे.
झोप पूर्ण झाल्यानंतर शरीर कायमच आनंदी आणि उत्साही राहते. शरीरात ऊर्जा टिकून राहते. पहाटे ३ ते ५ दरम्यान सगळीकडे खूप शांतताता असते. अशावेळी झोपेंतून उठल्यानंतर व्यायाम किंवा योगासने केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. दिवसाची सुरुवात पहाटेच्या योग किंवा ध्यानाने झाल्यास दिवस आनंदात जातो.
कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे मानसिक संतुलन चांगले असणे आवश्यक आहे. मनात निर्माण झालेल्या वाईट विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, श्वसन अधिक खोलवर होतं आणि मन शरीर कायमच आनंदी राहते.
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम
लवकर उठण्यासाठी टिप्स:
एकाच वेळी जास्त बदल करण्याऐवजी दररोज १५ मिनिटे लवकर उठून सवय बदला. लवकर उठण्यासाठी रात्री उशिरा झोपण्याची सवय टाळा आणि नियमित वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.
मानसिक आणि भावनिक फायदे:
सकाळी लवकर उठल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो. सकाळच्या शांत आणि ताज्या वातावरणात मन शांत असते, ज्यामुळे एकाग्रता वाढते. सकाळी मन ताजे आणि स्वच्छ असल्याने काम करताना अधिक लक्ष केंद्रित करता येते, त्यामुळे उत्पादकता वाढते.