लघवीला फेस येण्याची कारणे काय आहेत
लघवी जास्त वेळ दाबून ठेवल्याने किंवा वेगाने लघवी केल्यामुळे फेसाळ लघवी येते. याशिवाय, टॉयलेट बाउलमध्ये असलेल्या क्लिनिंग प्रोडक्टमुळे तुमच्या लघवीमध्ये बुडबुडे दिसू शकतात. तथापि, जर तुम्हाला वारंवार फेसयुक्त लघवी येत असेल, तर ते प्रोटीन्युरियाचे लक्षण असू शकते, जे किडनी स्टोन किंवा उच्च रक्तदाबासह होऊ शकते. याशिवाय लघवीत फेस येण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात, याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
लघवीत फेस येणे हे सामान्य असले तरीही सतत हा फेस येत असेल तर काही आजारांचे हे संकेत आहेत आणि वेळीच तुम्ही हे आजारांचे संकेत ओळखणे गरजेचे आहे. तुम्ही लघवी केल्यानंतर हा फेस जर जास्त काळ राहत असेल तर तुम्ही वेळीच आपल्या डॉक्टरांना भेट द्यायला हवी. मात्र हे असे नक्की का होते आणि तुमच्या शरीरात नक्की कोणत्या आजाराने घेरले जाण्याची शक्यता असू शकते हे आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
क्लिनिंग उत्पादने

क्लिनिंगच्या उत्पादनांमुळेही होऊ शकतो त्रास
शौचालय साफसफाईच्या उत्पादनांच्या वापरामुळेदेखील मूत्रात फेस येतो. तथापि, हे कोणत्याही रोगाचे लक्षण नाही. याव्यतिरिक्त, पुरेसे पाणी न पिणे किंवा जास्त व्यायाम केल्याने निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे लघवी अधिक घट्ट आणि फेसयुक्त होऊ शकते. याशिवाय लघवीचा रंगही गडद होईल आणि त्याला वास येऊ लागेल.
हेदेखील वाचा – लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग या विषयी माहिती
व्यायामामुळे होतो त्रास
उच्च-तीव्रतेच्या व्यायामानंतर, प्रथिने पूरक आहार घेतल्यावर फेसयुक्त लघवी येऊ शकते, परंतु हे मूत्रपिंड समस्या, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यासारख्या अधिक गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षणदेखील असू शकते. यामुळे वेळीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून याचे तुमच्या बाबतीतील नक्की कारण काय आहे हे शोधून काढावे
UTI चा त्रास

युटीआयचा त्रास होत असल्यास फेस येऊ शकतो
युटीआयमुळे लघवीमध्ये फेसदेखील येऊ शकतो. फेसयुक्त लघवी व्यतिरिक्त, उद्भवू शकणाऱ्या इतर लक्षणांमध्ये लघवी करताना वेदना किंवा जळजळ, वारंवार लघवी होणे आणि लघवीमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत आपण निश्चितपणे डॉक्टरांना भेटले पाहिजे. तसंच ही लाजेची गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही वेळीच डॉक्टरांशी बोलून घ्या
हेदेखील वाचा – तुम्हीसुद्धा आंघोळ करताना लघवी करता?; जाणून घ्या त्याचे परिणाम
डॉक्टरांना कधी दाखवावे
काही मिनिटांत फोम अदृश्य झाल्यास फेसयुक्त मूत्र अर्थात फोमिंग लघवी ही सामान्य असू शकते. तथापि, जर फेस कायम राहिल्यास आणि तुम्हाला इतर लक्षणे दिसली, तर ते आरोग्याच्या स्थितीचे लक्षण असू शकते, ज्यात किडनी स्टोन, यूटीआय किंवा कोलोवेसिकल फिस्टुला यांचा समावेश आहे. त्याच वेळी औषधांमुळे फेसयुक्त लघवी देखील होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला शंका असेल की फेसयुक्त लघवी औषधाचा दुष्परिणाम आहे, तर तुम्ही तुमच्या औषधांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी. तुम्हाला रोज असा त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांकडे दाखवायला तुम्हाला जावेच लागेल अन्यता याचे अधिक दुष्परिणाम होऊ शकतात.






