आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुपासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात झालेल्या अन्नपदार्थांचा शरीरावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे आहारात शरीराला पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. रोजच्या आहारात तुपाचे सेवन केल्यास शरीरात ओलावा कायम टिकून राहील. यासोबतच बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तुपामध्ये ओमेगा-३, जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. नियमित चमचाभर तुपाचे सेवन केल्यास त्वचा चमकदार होईल, हाडांचे आरोग्य सुधारेल, शरीरात ओलावा कायम टिकून राहील. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण तुपासोबत कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुपासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला कॅल्शियम आणि विटामिन्स मिळतात. पण तूप टाकून चुकूनही पालेभाज्यांचे सेवन करू नये. असे केल्यामुळे शरीरात गॅस आणि पचनाची समस्या उद्भवते. याशिवाय दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात सतत जड वाटू लागते.
चुकूनही साखर आणि तुपाचे एकत्र सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे अतिरिक्त विषारी घटक जमा होऊन पचनक्रिया बिघडते. आरोग्यासाठी तूप आमो साखर एकत्र खाणे अतिशय हानिकारक आहे. या मिश्रणामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे चुकूनही तूप साखरेचे एकत्र सेवन करू नये.
चिकन, मासे किंवा अंडी खाल्यानंतर तुपाचे सेवन करू नये. अनेकांना मासे किंवा चिकन बनवताना तूप वापरण्याची सवय असते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात. शरीर कमकुवत होणे, पचनक्रिया बिघडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मासे किंवा चिकन खाल्यानंतर तूप न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अनेक लोक निरोगी त्वचेसाठी सकाळी उठल्यानंतर एक चमचा तूप खातात. मात्र त्यावर लगेच कोणत्याही आंबट फळाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये विष तयार होऊ शकते, ज्यामुळे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचते. आंबट फळांमधील घटक तुपामध्ये मिक्स होतात, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू लागते. शरीरात वाढलेली जळजळ आरोग्यासाठी घातक आहे.