पोटावरील चरबी मेणासारखी जाईल वितळून! आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पद्धतीने प्या पाणी
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
रक्तभिसरण सुधारण्यासाठी कोमट पाणी?
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते, चयापचय क्रिया वेगवान होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. जगभरात असंख्य लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करत नाहीत. पण असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडते. कोमट पाणी शरीरासाठी औषधासमन असते. कोमट पाण्याचे नियमित केल्यामुळे केवळ पचनक्रियाच नाहीतर वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चला तर जाणून घेऊया कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे शक्तिशाली फायदे.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरातील ‘लिम्फॅटिक सिस्टम’ सक्रिय होते. शरीरातील विविध अवयवांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी अतिशय प्रभावी ठरते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या डिटॉक्स पेयांचे सेवन करण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण असे न करता सकाळी उठून कोमट पाणी प्यावे. सुरुवातीच्या तीन दिवसांमध्येच शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. कोमट पाणी मेटाबॉलिज्मला चालना देण्यास मदत करते आणि शरीरात साठलेली चरबी ऊर्जेसाठी वापरली जाते. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे. हा अतिशय जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
आठवडाभर नियमित कोमट पाण्याचे सेवन केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. गरम पाण्याच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो. रक्तप्रवाह सुरळीत चालू राहिल्यास मेटाबॉलिक कचरा बाहेर पडून जाण्यास मदत होते. हृदयावर आलेला तणाव कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.






