सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. जवजवळ सर्वच ठिकाणी पावसाने आपली हजेरी दर्शवली आहे. या ऋतूत कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. तसेच संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशात या हलक्या भुकेला शमवण्यासाठी काय बनवावे? असा प्रश्न पडतो. पावसाच्या या थंड वातावरणात तुम्ही क्रिस्पी आणि चटपटीत अशा कॉर्नची रेसिपी ट्राय करू शकता.
पावसाळ्यात जवळपास सर्वच ठिकाणी कॉर्न म्हणजेच मका विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे बाजारात तुम्हाला तो सहज वाजवी दरात उपलब्ध होतो. क्रिस्पी कॉर्न ही रेसिपी काही नवीन नाही अनेक हॉटेल्समध्ये ती उपलब्ध असते. मात्र तुम्ही अजूनही या रेसिपीचा आस्वाद घेतला नसेल तर तुम्ही फार अप्रतिम गोष्ट मिस करत आहात. कुरकुरीत कॉर्न, हातात चहाचा प्याला आणि समोर पाऊस… स्वर्गसुख म्हणजे मग आणखीन काय! हे कॉम्बिनेशन एकदा तर ट्राय करणे बनतेच. तुम्हीही आजवर या पदार्थाचा आस्वाद घेतला नसेल तर आजची ही रेसिपी लगेच फॉलो करा आणि घरी सर्वांना खाऊ घाला.
हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवेल चटकदार पांढऱ्या कांद्याचे लोणचे, त्वरित रेसिपी नोट करा
हेदेखील वाचा – शिळ्या चपातीपासून झटपट बनवा मसाला पोळी, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी