गणेशोत्सव हा सण सुरु असून आता लवकरच दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचा निरोप घेत त्याच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते, काही लोकांच्या घरी बाप्पाचा मुक्काम दहा दिवस असतो तर काही लोकांच्या घरी दीड, पाच किंवा सात दिवस मुक्काम असतो.
हा सण हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी एक आहे. या सणानिमित्त लोक बाप्पाची पूजा-अर्चा करत त्याच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ तयार करतात. आता बाप्पाचा नैवेद्य म्हटला की,मोदक हे आलेच, बाप्पाला मोदक फार आवडतात अशी मान्यता आहे. त्यानुसार, प्रत्येकजण कधी ना कधी बप्पासाठी मोदक तयार करून त्याला अर्पण करत असतात. मोदक हे अनेक प्रकारे बनवले जातात मात्र तुम्हाला बाप्पाच्या प्रसादासाठी काही हटके करायचे असेल तर तुम्ही नट्स चॉकलेट मोदक तयार करू शकता. हे मोदक बाप्पालाच काय घरातील सर्वांनाच फार आवडतील. जाणून घ्या हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी घरी बनवा पारंपरिक सातूचे लाडू
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा चविष्ट बदाम पोळी