आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स
यूकेमध्ये नथिंग हेडफोन (a) ची किंमत GBP 149 म्हणजेच सुमारे 18,200 रुपये, यूएसमध्ये $199 म्हणजेच सुमारे 18,200 रुपये आणि यूरोपमध्ये EUR 159 म्हणजेच सुमारे 17,000 रुपये आहे. हेडफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये काळा, पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचा समावेष आहे. ब्रँडने दिलेल्या माहितीनुसार, हेडफोन (a) चे ग्लोबल प्री-ऑर्डर सुरु झाले आहे. काळा, पांढरा, गुलाबी रंगाच्या व्हेरिअंटची विक्री 13 मार्चपासून सुरु होणार आहे. लिमिटेड-एडिशन असलेले पिवळा कलर ऑप्शन 6 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. नथिंगने अद्याप त्यांच्या नवीनतम ओव्हर-इअर हेडफोन्सची किंमत किंवा उपलब्धता भारतात जाहीर केलेली नाही. (फोटो सौजन्य – X)
नथिंग हेडफोन (a) चे डिझाईन अतिशय हलके आहे. या हेडफोनचे वजन 310 ग्रॅम आहे. ऐकताना अधिक आराम मिळावा यासाठी त्यात ब्रीदेबल मेमरी फोम इअर कुशन आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लेटेस्ट लाँच हेडफोन्समध्ये अडॅप्टिव एक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) देण्यात आला आहे. जे वातावरणानुसार आवाज रद्द करण्याची पातळी आपोआप एडजस्ट करू शकते.
व्हॉईस कॉलिंगसाठी हेडफोन तीन-माइक्रोफोन एनवायर्नमेंटल नॉइज कँसलेशन (ENC) सिस्टिमचा वापर करते. यामध्ये बॅकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी आणि यूजरचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकण्यासाठी मदत होते. यामध्ये स्टॅटिक स्पॅटियल ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे सराउंड साउंड अनुभव प्रदान करते, जे ऑडिओ प्लेबॅक सुधारते.
हेडफोनच्या इयरकपमध्ये नथिंगचे फिजिकल कंट्रोल सिस्टम इंटीग्रेटेड आहे. यामध्ये रोलर, पॅडल आणि बटन कंट्रोल समाविष्ट आहे. याच्या मदतीने यूजर वॉल्यूम एडजस्ट केला जाऊ शकतो, मोड बदल शकतो आणि साध्या जेश्चरसह ट्रॅक नेव्हिगेट केले जाऊ शकते. बटन चॅनल हॉपला देखील सपोर्ट करते. जेणेकरून यूजर अॅप्स आणि फंक्शन्समध्ये जलद स्विच करू शकतील. याशिवाय, बटन कंट्रोलचा वापर कॅमेरा शटर ट्रिगरसाठी केला जाऊ शकतो. हे जोडलेल्या स्मार्टफोनवर दूरस्थपणे फोटो कॅप्चर करण्यास किंवा व्हिडिओ सुरू करण्यास मदत करते. यूजर नथिंग एक्स कंपॅनियन अॅपद्वारे ऑडिओ सेटिंग्ज कस्टमाइझ करू शकतील. या डिव्हाईसचे एक वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी लाइफ, जे एका चार्जवर 135 तासांपर्यंत प्लेबॅक देऊ शकते, जे पाच दिवसांच्या समतुल्य आहे असा कंपनीचा दावा आहे.






